ब्राम्हणशेवगे पंचक्रोशीत गावठीचा कहर कोरोना च्या पार्श्वभूमीवर दारूबंदीची मागणी पोलिसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष
प्रतिनिधी सोमनाथ माळी
येथील गावठी दारू ग्रामपंचायती मार्फत बंद केली आहे. परंतु परिसरातील शेवरी व पिंप्री येथे जणू गावठी दारूचा महापुरच आला आहे अस म्हटल तर वावग ठरणार नाही.
ब्राम्हणशेवगे येथे गेली २५ वर्षांपूर्वी तब्बल २० ते २५ लोक गावठी दारू पाडून विक्री करत होते.रोजच भांडण,वाद या गोष्टीना कंटाळून गावाचे सरपंच नयनाबाई उध्दवराव बाविस्कर व गावातील काही तरूण एकत्र येत हातभट्टी बंदच करण्याचे ठरवले व कधी समजावून तर कधी मडके फोडून दोन ते तीन महिने संघर्ष करत शंभर टक्के गाव दारूबंदी करण्यात आली होती.मध्यंतरी राजकिय पोळी शेकू.
पाहणार्यानी एक दोन जणांना हाताशी धरून पिंप्री व शेवरी येथून विकण्यास सुरवात केली आहे परंतू संध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीतर्फे व कोरोना जनजागृती समिती व ग्रामदक्षता समिती तर्फे आज रोजी जवळपास शंभर टक्के गाव दारूबंदी करण्यात आली आहे.पण गावाच्या वेशीवर म्हणजे च पिंप्री जी मेहूणबारे पोलीस स्टेशन हद्दीत येते आणि शेवरी माळशेवगे गावातील एक वस्ती जी चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते.या दोन्ही गावात कधीच आणि कोन्हीच दारू बंद करू शकली नाही आणि भविष्यातही होणार नाही असा समज या गावठी दारू पाडणार्याचा झाला आहे. कारण या गावातील गावठी दारू पंचक्रोशीतील गावांना पुरवली जाते.हे पोलीसांचा आशिर्वाद असल्या शिवाय शक्यच नाही. या गावठी दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत.आणि आता कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही दारू आता लगेच बंद झाली नाही तर सोशल डिस्टन्सन न पाळणारी अनेक दारूडे दारू पिऊन दररोज शेकडोच्या संपर्कात येत आहेत.
मागिल महिन्यात मेहूणबारे पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंद्रे साहेब छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत सेवालाल महाराज जयंती च्या पार्श्वभूमीवर दक्षता समितीच्या बैठकीत गावातील युवकांनी दारूबंदी बाबत माहिती दिली होती. त्याप्रसंगी साहेबांनी आपल्या अधिपत्याखालील कर्मचारीना दारू बंद करण्याबाबत सक्त सुचना दिल्यानंतरही अर्थपुर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे कालपर्यत गावठी चोरुन दपुन विकली जात होती. आज जरी गावात दारू मिळणार नसली तरी शेजारच्या गावात भरमसाठ दारू मिळणार असली तर हे माध्यम कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार करण्याचे एक माध्यम ठरू शकते.त्यामुळे ब्राम्हणशेवगे येथील नागरिकांना आता कोरोनाच्या या राक्षसापासून आरोग्य विभागानंतर पोलिसच वाचवू शकतील ती म्हणजे शेवरी व पिंप्री या गावाची गावठी दारू बंद झाली तरच.मेहूणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंद्रे साहेब हे अतिशय कार्यक्षम,तत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात पण त्याच्या अधिपत्याखालील कर्मचारी अर्थपुर्ण दुर्लक्ष करतात.ह्या गंभीर व संकट समयी तरी गावठी दारू बंद झाली पाहीजे अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ करत आहेत.
चाळीसगाव व मेहूणबारे पोलीस स्टेशन यांनी संयुक्त पण तात्काळ दखल घेत गावठीचा कायम बंदोबस्त करावा अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चा चे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांनी केली आहे.






