श्रीराम फाउंडेशनतर्फे नगरपालिकेला निर्जंतुकिकरण यंत्र प्रदान
रावेर प्रतिनिधी– शकील शेख
संपूर्ण जगात कोरोना या आजाराने थैमान माजवले आहे. रावेर शहरात नगरपालिका शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी यंत्रणेचा वापर करीत आहे. मात्र शहराच्या झालेल्या हद्दवाढी मुळे हि यंत्रणा तोकडी पडत असल्याने तसेच अधिक फवारणी यंत्रे उपलब्ध नसल्याने नगर नगरपालिका प्रशासनाने श्रीराम फाऊंडेशन चे अध्यक्ष श्रीराम पाटील यांचे कडे प्रस्ताव ठेवल्याने जन हिताच्या या मागणीला त्यांनी तात्काळ मंजुरी देवून फवारणी यंत्र बसवून दिले.
या मशीनचे लोकार्पण मुख्याधिकारी रवींद्र लांडे, श्रीराम फाउंडेशनचे सचिव दीपक नगरे, उपाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ललित चौधरी, आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी आदींसह सफाई कामगार उपस्थित होते. उद्योग करून सामाजिक बांधिलकी जोपासून आपले कर्तव्य निभावण्यासाठी श्रीराम पाटील सदैव अग्रेसर असतात. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे देखील त्यांनी आश्वासन दिले आहे.






