प्रतिनिधी धनेश्वर जुमनाके
चिमुर—:: भारतात व महाराष्ट्र राज्यात कोरोना वायरस ने धुमाकूळ घातल्याने अक्षरशः वातावरण ढवळून निघाले आहे.जगात कोरोना मुळे दहशत पसरली आहे.भारतात 24 लोकांचा मृत्यू झाला आहे.व हजारो लोक बाधित आहे.त्यामुळे सरकार ने २१ दिवसाचे लाँक डाऊन करीत लोकांना वाचविण्यासाठी धडपड करीत शासकिय यंत्रना कामी लागली आहे. पण पक्ष्यांसाठी कोणतिही यंत्रणा नसल्याने पक्ष्यांची फरफट होत आहे.
उन्हाळा सुरु झाला असुन पक्ष्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती चालु आहे. पाण्या अभावी प़क्षी मरण पावत आहे. वृक्ष तोड, वनवा, मोबाइल चा अती वापर, रासायनिक खतांचा अती वापर, याबरोबरच पाणी न मिळाल्याने पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. मानव आपली तहान भागवु शकतो पण पक्ष्यांना आपली तहान भागविण्यासाठी दारोदारी भटकावे लागते. उन्हाळ्यात तर पक्षी कुठेही आपल्या पाण्या अभावी मरन पावलेले दिसतात. पर्यावरण असमतोलामु़ळे पक्षी नाहीसे होत आहे. पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पुर्वी प़क्षी खुप दिसायचे. प़क्ष्यांचा चिवचिवाट, पक्ष्यांचे मधुर गाणे, किलबिलाट यामुळे पर्यावरणाचे सौंदर्य सजुन दिसायचे. पण आता पक्ष्यांची संख्या कमी झाल्याने पर्यावरणाचे सौंदर्य कमी झाले आहे.
पक्ष्यांना पाण्याअभावी मृत्यू होउ नये यासाठी पर्यावरण संवर्धन समीती चिमुर चे अध्यक्ष कवडू लोहकरे व त्यांचे कुटुंब यांचे कडुन आपल्या घरी झाडावर पक्षी जलपात्र लावण्यात आले.






