Maharashtra

?️ Big Breaking होम कोरोंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवर हल्ला

?️ होम कोरोंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवर हल्ला

आनंद काळे

बारामती- बारामती परिसरातील जळोची येथे होम कोरोंटाईन केलेल्या नागरिकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली.या घटनेमध्ये 4 पोलीस अधिकारी,5 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.जखमीमध्ये 2 महिला पोलीस अधिकाऱ्यांसह एक महीला पोलीस कर्मचारीचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळोची परिसरातील काही नागरिकांना वैदकीय विभागाने होम क्वांरटाईन केले आहे,तसा शिक्का देखील नागरिकांच्या हातावर मारण्यात आला आहे.शुक्रवारी दुपारी हे होम क्वारटाईन केलेल्या नागरिकांना बाहेर फिरू नका असे सूचित करून हटकले यावरून स्थानिक नागरिक आणि त्या नागरिकांमध्ये वाद झाला. ह्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली दोन्ही गटाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

परंतु होम क्वांरटाईन केलेल्या लोकांनी दंडुके, दगड व लोखंडी रॉड ने पोलिसांवर हल्ला चढविला, त्यामध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,सह्यायक पोलीस निरीक्षक पदमराज गंफले, सह्यायक पोलीस निरीक्षक योगेश शेलार,सह्यायक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे पोलीस कर्मचारी पोपट नाळे, सिदेश पाटील,पोपट कोकाटे महिला पोलीस कर्मचारी स्वाती काजळे, रचना काळे यांचा सामावेश आहे.कर्मचाऱ्यांच्या हाताला,डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button