Maharashtra

अमळनेर चे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने एमडी डॉक्टरांची सर्दी-ताप-खोकला मोफ़त तपासणी सेवा सुरू

प्रतिनिधी नुरखान

अमळनेर चे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील सहकार्याने शहरातील एम डी डॉक्टर्स यांनी तालुक्यातील नागरिकांना ताप सर्दी खोकला या आजारावर मोफत चिकित्सा सेवा समर्पित करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आलाआमदार अनिल पाटील यांनी घेतलेल्या पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आलीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी या शहरातील सर्व एमडी डॉक्टर्सशी चर्चा करून गुरुवारी प्रांताधिकारी व आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली व त्यात येथील डॉक्टर्स शासनाला मदत म्हणून आमदार अनिल पाटील यांच्या आग्रहाने एक विनामूल्य सेवा करण्यासाठी तयार झाले आहेत. शहरात व तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेकडून पुरेसं आव्हान स्वीकारले जाणार नाही म्हणून आमदार पाटील यांनी स्थानिक जनतेच्या सेवेकरिता व जास्त कोरोना पसरू नये यासाठी ही उपाययोजना सुरू केली आहे.दि. 27 पासून सर्दी -ताप- खोकला तपासणी सेवा सुरू करण्यात येत असून शहरातील सर्व एमडी डॉक्टर्स व आय एम ए संघटनेचे सदस्य प्रशासनाला मदत करणार आहेत. त्यात सर्दी, ताप, खोकला, असणाऱ्या पेशंटची तपासणी करण्यात येणार आहेत. व गोळ्या औषधे लिहून देणार आहेत.शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्सकडे येणाऱ्या सर्व रुग्णांना या ठिकाणी पाठवण्याची सूचना करण्यात येणार असुन त्या सर्वांची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे त्यांनी अशा लक्षणांची रुग्ण साने गुरुजी शाळेत पाठवावीत. तसेच याठिकाणी इतर आजारांवर तपासण्या होणार नाहीत त्यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांनी येऊ नये.असे आव्हान करण्यात आले आहे.

अमळनेर चे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने एमडी डॉक्टरांची सर्दी-ताप-खोकला मोफ़त तपासणी सेवा सुरू

सर्दी खोकला ताप अशा लक्षणे आढळलेल्या सर्व रुग्णांना याठिकाणी एकत्रित करण्यात येणार असून अशा रुग्णांची तपासणी *साने गुरुजी शाळेत* सकाळी 10 ते 1 तपासणी होणार आहे. विनाकारण तपासायला येणार्यांना प्रवेश दिला जाणार नाही , याठिकाणी प्रांताधिकारी सीमा अहिरे या सर्व विखुरलेले रुग्णांना एकत्र करून त्यांच्या तपासण्या करून घेणार आहेत.

अमळनेर चे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने एमडी डॉक्टरांची सर्दी-ताप-खोकला मोफ़त तपासणी सेवा सुरू

सदर बैठकीस आमदार अनिल पाटील प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, डॉ अविनाश जोशी, डॉ संदीप जोशी, डॉ निखिल बहुगुणे, डॉ किरण बडगुजर, प्रशांत शिंदे, हे उपस्थित होते.

अमळनेर चे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने एमडी डॉक्टरांची सर्दी-ताप-खोकला मोफ़त तपासणी सेवा सुरू

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button