औसा प्रतिनिधी:- प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
औसा तालुक्यातील तांबरवाडी गावचे शिवाजी जाधव व लताबाई जाधव यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रावर गुलाब शेतीची लागवड केली होती.आणि अशातच गावामध्ये पाणीटंचाई ची समस्या गावकऱ्यांना भेडसावत होती.यावेळी जाधव कुटुंबाला ही गोष्ट समजली आणि तात्काळ आपल्या गावासाठी मोफत पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली.आजच्या विज्ञान युगात स्वतःच्या शेतीचा विचार न करता कसल्याही गोष्टीची अपेक्षा न करता.
स्वखर्चाने पाणी गावात आणून आणि कुठलाही लोभ न बाळगता कडक उन्हाळ्यात तांबरवाडी ग्रामस्थांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून खरंच आजच्या काळातही माणुसकी शिल्लक आहे हे तांबरवाडीच्या शिवाजी जाधव यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.उन्हाळा म्हणला की पाण्याची टंचाई ही भासते ही गोष्ट लक्षात येताच शिवाजी जाधव यांनी गेल्या वर्षी गावापासून जवळच असलेल्या आपल्या शेतात स्वखर्चाने पाणी उपलब्ध केले व स्वतःच्या दीड एकर क्षेत्रावर गुलाबाची शेती मोडून गावकऱ्यांसाठी तात्काळ ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून दिले.जाधव कुटूंबाच्या या चांगल्या निर्णयासाठी त्यांच्या पत्नी सौ लताबाई शिवाजी जाधव यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आपल्या शेतीचा विचार न करता गावात पाण्याची उपलब्धता करून तांबरवाडी च्या जाधव दाम्पत्याने केले आहे.
जाधव कुटुंबाच्या या चांगल्या निर्णयामुळे रखरखत्या उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले असल्याने गावातील नागरिका कडून स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.






