पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर पाडेगाव मधील श्री शेत्र दत्त मंदिर नदीच्या घाटावर दशक्रिया विधी दोन्ही जिल्ह्यासाठी बंद
लोणंद दिनांक 26 दिलीप वाघमारे
पुणे सातारा जिल्ह्याच्या शिमे वर पाडेगाव येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर नीरा नदीच्या घाटावर दशक्रिया विधी दोन्ही जिल्ह्यासाठी बंद करण्यात आली असल्याची माहिती पुजारी श्री समीर पाळंदे कर यांनी माहिती दिली ते पुढे म्हणाले सातारा जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने 144 कलम जिल्ह्यात लागू केले व कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्य जनता रोगराईला बळी पडू नये म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी एकत्र जमावे बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत याठिकाणी दशक्रियाविधी बंद करण्यात आली आहे तरी दोन्ही जिल्ह्याच्या नागरिकांनी या सूचनेचे पालन करण्यात यावे अन्यथा कारवाई केली जाईल






