Motha Waghoda

मोठा वाघोदा ग्रामविकास अधिकारी ,सरपंचांकडून कलम १४४ चे उल्लंघन करीत मासिक सभा थाटात संपन्न जमावबंदी कायद्याचे उल्लंघन

मोठा वाघोदा ग्रामविकास अधिकारी ,सरपंचांकडून
कलम १४४ चे उल्लंघन करीत मासिक सभा थाटात संपन्न
जमावबंदी कायद्याचे उल्लंघन

प्रतिनिधी / मुबारक तडवी मोठा वाघोदा .ता.रावेर.

जगासह देशात खळबळ माजविलेल्या कोरोना ( कोविड १९ ) या व्हायरस चे संक्रमणामुळे हाहाकार माजला असतांनाच बचावासाठी म.पंतप्रधान, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,यांचेसह जिल्हाधिकारी जळगांव यांचे शासन आदेश असताना कलम १४४ जमावबंदी कायद्यान्वये ५ व्यक्तींना एकत्र जमण्याची बंदी असताना सुध्दा महाशय ग्रामविकास अधिकारी डी.आर.जयंकार व सरपंच मुकेश तावडे यांनी शासन आदेशाचा खेळ खंडोबा करीत केराची टोपली दाखवितच आज दि .२३/३/२०२० सोमवार रोजी काही विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र बोलवित कोरम पुर्ण करीत ५ व्यक्तिंपेक्षा अधिक लोक एकत्रित करून कलम १४४ जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केलेले आहेच पण शासन प्रशासनाने पारित केलेल्या आदेशांची पायमल्ली करीत पायदळी तुडवित शासनादेशांचे नियम ही धाब्यावर ठेवण्याचे महान कार्य सुध्दा सरपंच व ग्रामसेवक या दोन्ही महाशय यांचे कडून जाणूनबुजून करण्यात आले आहे.

एकीकडे केंद्र सरकार,राज्य सरकार शासन प्रशासन या अतिभयंकर कोरोना व्हायरस कोविड १९ चर्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत मात्र सर्वाच्या मेहनतीवर पाणी फिरविणार्या या मोठा वाघोदा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी व सरपंच यांना काही एक सोयरसुतक न असणार्या दोषी अधिकारी व पदाधिकारी यांचेवर वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करणार ? शासनाच्या आदेशांची पायमल्ली करणारे दोषींवर कायदेशीर कारवाई होणार काय ? याकडे मोठा वाघोदा वासियांचे लक्ष लागुन आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button