कोरोना स्पेशल ….प्रतिबंधनात्मक उपाय योजनांसह अमळनेर तहसील आणि पोलीस प्रशासन सज्ज...
मा तहसिलदार मिलिंदकुमार वाघ आणि मा पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम सुरू…
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर येथे कोरोना प्रादुर्भाव वाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तहसील आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जनतेत जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येत आहे. मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या आदेशानुसार आज तहीसल कार्यालयाचे वाहन ध्वनी यंत्रणा लावून सर्वत्र आवाहन करत आहेत.विविध ठिकाणी घेण्यात येणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अगदी लग्न सोहळा देखील जास्त गर्दीत न करण्याचे आवाहन मा पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी केले आहे. अनावश्यक दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जास्तीत जास्त गर्दीच्या ठिकाणांना बंद करण्यात आले आहे. मंदिर,बाजारपेठ,सामूहिक सोहळे,मंडळे इ बंद ठेवण्यात प्रशासनाला चांगला प्रतिसाद नागरिक देत आहेत.
त्याच प्रमाणे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,आपले सहकारी शरद पाटील यांच्या सह संपूर्ण शहरात पेट्रोलिंग करत असून कुठेही गर्दी ,गोंधळ आढळून येणार नाही याची काळजी घेत आहेत.पोलीस वाहनावरही कोरोना प्रादुर्भाव थांबविण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भात ध्वनी फितीद्वारे सामान्य जनतेत जन जागृती करत आहेत.स्वतः पोलीस निरीक्षक प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटी देत आहेत आणि जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना संदर्भातील माहिती सामान्य जनते पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपणही एक जागृत नागरिक म्हणून काही गोष्टींचे पालन करू या आणि प्रशासनाला आणि आपल्या स्वतःला देखील मदत करु या…..






