?️ तमाशा फड मालकाला सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा शेतकऱ्या प्रमाणे आत्महत्या करू- तमाशा प्रमुख स्वाती अंजना शेवगावकरसुनील नजनअहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या यात्रा यावर्षी आलेल्या साथीच्या आजारामुळे बंद करण्यात आलेल्या आहेत.तमाशाच्या कलेवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कलावंतांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे कलाकार देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे तमाशा फड मालकावर उपासमारीची वेळ आलेली आहे.सरकारने शेतकऱ्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील तमाशा फड मालकांना अनुदान दिले पाहिजे नाहीतर शेतकऱ्याप्रमाणे तमाशा फडमालक आत्महत्या करून तमाशा कला संपवून टाकतील अशी जळजळीत प्रतिक्रिया शेवगाव येथील सुप्रसिद्ध तमाशा फडमालकिन स्वाती अंजना शेवगावकर यांनी दिली.






