विधान परिषद निवडणुकी संदर्भात एम.आय.एम पक्षातर्फे नगरसेवकांना व्हीप जारी
फहिम शेख
रविवार दि. १५ मार्च रोजी एम.आय.एम. चे राष्ट्रीय अध्यक्ष ओवैसी साहेब यांच्या आदेशाने व धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह यांच्या नेतृत्वाखाली व एम.आय.एम. जिल्ह्याध्यक्ष हाजी कलीम शाह यांच्या अध्यक्षतेखाली एम.आय.एम. च्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या धुळे/नंदुरबार जिल्ह्यासाठी पोट निवडणूक दि. ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासंबंधी धुळे जिल्ह्याध्यक्ष हाजी कलीम शाह व शहराध्यक्ष शमसुलहुदा शाह, तसेच नंदुरबार जिल्हाध्यक्ष सैय्यद रफत व शहादा एम.आय.एम. शहर अध्यक्ष सद्दाम मन्सुरी यांना धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह यांच्या मार्गदर्शनानुसारच विधान परिषद साठी हाजी कलीम शाह व सैय्यद रफत सांगतील त्या उमेदवाराला आमदार डॉ. फारूक शाह यांच्या नेतृत्वाखाली मतदान करण्यास सांगतील त्याच उमेदवारालाच मतदान करावयाचे आहे. जो नगरसेवक पक्षाच्या व्हीप व आदेशाचे पालन करणार नाही त्यास पक्षातर्फे बडतर्फ करण्यात येईल व संबंधित नगरसेवकावर पक्ष आदेश उल्लंघना अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह यांच्या तर्फे कळविण्यात आले आहे.






