लवकरच कांदा निर्यातीवरील बंदी उठणार…उत्पादन शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे..मा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले पत्र
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यात सद्यस्थितीत कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. निर्यातबंदीमुळे कांद्याचा भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जनउद्रेक होऊन भाववाढीसाठी व निर्यातबंदी उठविण्यासाठी राज्यभरात शेतकन्यांची ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकन्यांचा प्रश्न पाहता यातून मार्ग काढणेसाठी कांद्यावरील
नियांतवंदी उठविणेबाबतचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करणे आवश्यक आहे.
तसंच याकरिता केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. रामविलास पासवान, मंत्री, अन्न व नागरी पुरवठा
यांचेसोबत चर्चा झाल्यास कांदा उत्पादक शेतकन्यांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघेल. योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती ना बच्चू कडू यांनी पत्राद्वारे केली आहे.






