Mumbai

सावरकर स्मारकात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन देशाच्या अंतर्गत शत्रूंविरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरा – रणजित सावरकर

सावरकर स्मारकात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन
देशाच्या अंतर्गत शत्रूंविरोधात वेळप्रसंगी
रस्त्यावर उतरा – रणजित सावरकर

मुंबई पी व्ही आंनद

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका होतयं, पण आजही ते विचारांच्या माध्यमातून जिवंत आहेत आणि त्यांचे विचारच देशाला मार्गदर्शक आहेत, ते मानले तर आपल्याला भवितव्य आहे. त्यामुळे देशभक्तीची ही मोहीम पुन्हा सुरु झाली पाहिजे, राष्ट्राच्या शत्रूविरुद्ध लढायला सैन्य समर्थ आहे. आपण अंतर्गत शत्रूंच्या विचारांविरुद्ध लढण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे परखड मत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 54 व्या आत्मार्पण दिनानिमित्ताने दादर परिसरातून स्वातंत्र्यवीरांच्या विचारांच्या समर्थनार्थ अनुयायांची भव्य अभिवादन यात्रा आयोजित करण्यात आली. त्याचा समारोप स्मारकात अभिवादन सभेत झाला. त्यावेळी ते बोलत होते. 100 वर्षांपूर्वीही दंगली होत होत्या . भारताशी काहीही संबंध नसलेल्या मुद्यावर दंगली घडविल्या होत्या. देशभर हिंदूंच्या कत्तली झाल्या, महिलांवर बलात्कार झाले. त्यावेळी त्यांना गांधींनी साथ दिली आणि आज 100 वर्षांनंतर अशाच देशविघातक कार्यासाठी त्यांचाच पक्ष त्यांना साथ देतोयं, हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार राहुल शेवाळे यांनी लायकी नसलेल्या आणि ज्यांना स्वातंत्र्यवीरांचा इतिहास किंवा योगदान माहीत नाही, त्यांच्याकडून बदनामी करण्याचे काम होणे दुर्दैवी आहे. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सन्मान भारतरत्नातून झाला पाहिजे. त्यांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंतदेखील पोहचविण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे आवाहन केले.
गेले काही दिवस देशामध्ये सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, त्याग बाजूला सारून राष्ट्रकार्य कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे. . वेगळे काहीतरी दाखविण्याचा प्रयत्न होतोयं, ते थांबवले पाहिजे. मुंबई, देशभरात या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी पुढे आले पाहिजे. स्वातंत्र्यवीरांचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवला पाहिजे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button