मोठा वाघोदा येथील गरिब तरुणांचा लक्षाचा जिप्सीनामा
28 फेब्रुवारीला पुस्तक होणार प्रकाशित
प्रतिनिधी /- मुबारक तडवी
मोठा वाघोदा ता.रावेर
मोठा वाघोदा येथील रहिवासी तसेच कबाड कष्ट करुन उदर निर्वाह करीत असलेल्या कुटूबातील दारिद्र्याची जाण असणारा व गरिबी तून हलाखिची परिस्थिती तुन येणाऱ्या समश्यांना तोंड देत शिक्षणासाठी झुंज देत मार्गक्रमण करणार्या व सध्या बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात कार्यरत असलेला होतकरू अभ्यासु तरुण विद्यार्थी प्रवीण वानखेडे उर्फ लक्षाचे “जिप्सी नामा” हे कहानी संग्रह असलेले पुस्तक येत्या 28 फेब्रुवारीला ऑनलाइन प्रकाश होणार असून,हे पुस्तक त्यांच्या प्रवासात भेटलेल्या व्यक्तींविषयी आहे ज्यात सामाजिक असमतोल, सामाजिक समस्या, जसे की भूक, शेतकरी आत्महत्या, मानसिक दडपण, दुष्काळ आदींविषयी 14 कथा आहेत सदर कथा आपणास ग्रामीण भारत आणि त्यात होरपळून निघालेल्या व्यक्तींविषयी माहिती देण्यास व त्यांचे जीवन क्षणभर का होईना जगण्यास मदत होईल
तसेच त्यांना काही दिवसांपूर्वी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचा सर्टिफाइड एज्युकेटर चा बॅच मिळाला असून भविष्यात नॅशनल जिओग्राफी चॅनल सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.गरीब व हलाखीची परिस्थितीतून शिक्षण घेऊन अभिमानास्पद कार्य केल्याने मोठा वाघोदा सर्व धर्मीय गावकर्यांतर्फे त्यांचे कौतुक होत आहे.






