Faijpur

फैजपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

फैजपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

सलीम पिंजारी

फैजपूर प्रतिनिधी: बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे दिपाली गृप्स कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शिवरायांना अभिवादन करण्यात आले.यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ दिपाली चौधरी झोपे यांनी प्रतिमा पुजन करुन व शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक श्री अमोल निंबाळे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी भाजपा शहर सरचिटणीस संजय सराफ, कॉंग्रेस चे ज्येष्ठ पदाधिकारी मुख्याध्यापक गणेश गुरव सर, मानवाधिकार फोरम जिल्हाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील,दिव्यांग सेना शहराध्यक्ष श्री नितिन महाजन,सौ.भारती पाटील,नंदु साळी,माजी सैनिक ज्ञानदेव चौधरी राजू काठोके, संदिप माळी, राकेश करोसिया,लखन चिरावंडे, देवेंद्र झोपे,पिंटू मंडवाले,पाचपोळ साहेब, संदिप सोनवणे,भाविल पाटील,पार्थ झोपे इ.विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांनी स्वराज्यासाठी केलेलं कार्य,बलिदान यांविषयी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button