तलवारीला तलवारीने उत्तर देऊ
मनसेचा मुंबईत महामोर्चा
पी व्ही आनंद
देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसेने आज मुंबईत महामोर्चा काढला असता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाला संबोधित केले.
काय राज ठाकरे म्हणाले..:
▪ सीएए आणि एनआरसी विरोधात देशभरात निघणाऱ्या मोर्चांना आज मोर्चाने उत्तर देत आहे.
▪ मात्र हे मोर्चे सुरूच राहिले तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल
▪ परदेशात घुसखोरांना थारा दिला जात नाही. मग माणुसकीचा ठेका काय फक्त भारतानं घेतलाय का?
▪ पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणारे मुसलमान प्रामाणिक आहेत. ते राहतात तिथं दंगली होत नाहीत.
▪ राम मंदिर व कलम 370 मी आधीही समर्थन केलंय; चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलंच पाहिजे
दरम्यान, मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून निघालेला हा मोर्चा आझाद मैदानात पोहचताच जाहीर सभेत रूपांतरित झाला. यावेळी राज ठाकरे यांनी ‘सीएए’च्या समर्थनार्थ आपली भूमिका स्पष्ट केली.






