Thane

मा. शरद पवार यांनी दिलेला शब्द पळाला,ज्या आदिवासी झोपडीत जेवले त्या झोपडीचे बांधकाम सुरू…

मा. शरद पवार यांनी दिलेला शब्द पळाला,ज्या आदिवासी झोपडीत जेवले त्या झोपडीचे बांधकाम सुरू…

प्रतिनिधी ऍड अमोल

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शहापूरमधील दौऱ्यात पाडा येथे एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर पवार यांनी आदिवासी पाड्यातील एका झोपडीत जेवणाचा आस्वाद घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी झोपडीत जेवतानाचा फोटो शेअर केला असून, या नेत्याला काय म्हणावे…अशी भावना व्यक्त केली आहे.

मा. शरद पवार यांनी दिलेला शब्द पळाला,ज्या आदिवासी झोपडीत जेवले त्या झोपडीचे बांधकाम सुरू...जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर जेवतानाचे फोटो पोस्ट करताना लिहिलं आहे की, “या नेत्याला काय म्हणावे…कुडाची झोपडी…आदिवासी मावशीने केलेला स्वयंपाक…तांदळाची भाकरी… भाजलेला कोंबड्याचा रस्सा… कनटोरल्याची भाजी…आणि साहेब जेवत आहेत…संस्मरणीय दिवस.” अशा शब्दांत आव्हाड यांनी ट्विट केले आहे.

जेवण झाल्यानंतर पवार यांनी या आदिवासी गरीब कुटुंबाला झोपडीच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. शरद पवार वाऱ्याचा पाडा येथे ज्या झोपडीत बसून जेवले, त्या रामचंद्र खोडके या आदिवासी गरीब कुटुंबाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने घर बांधून दिले जात आहे.
पवार जेवले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच पक्क्या घराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्याच झोपडीच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कायापालट होणार आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे नीलेश सांबरे, बबन दादा हरणे, हरेश पष्टे यांनी पुढाकार घेऊन हे घर बांधण्याचे जाहीर केले होते.
शरद पवार यांच्या वचनाची तत्काळ पूर्तता करणे दुसऱ्या दिवसापासूनच सुरू झाले आहे. रामचंद्र खोडके आणि पत्नी कमळ यांचा मुलगा दहावीत तर मुलगी सातवीमध्ये शिकत आहे. मोलमजुरीवर गाडा चालत असलेल्या या कुटुंबाचे कुडाचे चंद्रमौळी घर आहे. त्यांना कधी वाटलेही नसेल, की आपण कधी पक्‍क्‍या घरात राहायला जाऊ. घर बांधण्याचे काम सुरू असून, फेब्रुवारी महिन्यात बांधकाम पूर्ण झालेले असेल, असे जिजाऊ संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button