Maharashtra

दोषींना फाशी द्या, नाही तर संविधान जाळा निर्भया च्या आईचा उद्रेक

दोषींना फाशी द्या, नाही तर संविधान जाळा निर्भया च्या आईचा उद्रेक

प्रा जयश्री साळुंके

दिल्ली

निर्भया’ बलात्कार प्रकरणातल्या दोषींची फाशीची शिक्षा पुन्हा एकदा टळली आहे.
त्यानंतर निर्भयाच्या आईने मात्र अत्यन्त दुःख झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहे. दोषींची फाशी सतत टाळून आम्हाला त्रास दिला जात असल्याचं निर्भयाच्या आईने म्हटले आहे.

दोषींना फाशी द्या, नाही तर संविधान जाळा निर्भया च्या आईचा उद्रेक

मध्यंतरी उच्च न्यायालयाच्या वकील कोर्टाच्या वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी दिलेल्या निवेदनाने नवा वाद निर्माण केला होता. वास्तविक इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईला दोषींना क्षमा करण्याचे आवाहन केले होते. इंदिराच्या या विधानामुळे निर्भयाची आई आशादेवी दुखी झाल्या होत्या.
यावर त्यांनी आपल्या मुलांच्या बाबतीत असे घडले असते तर काय केले असते असा प्रश्न विचारला होता.

दोषींना फाशी द्या, नाही तर संविधान जाळा निर्भया च्या आईचा उद्रेक

यानंतर दि 1 फेब्रुवारी 2020 रोजी फाशीची शिक्षा देण्यात येणार होती.परंतु पटियाला उच्च न्यायालयात आरोपीं तर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे निर्भया च्या आरोपींची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे.

दोषींना फाशी द्या, नाही तर संविधान जाळा निर्भया च्या आईचा उद्रेक

दोषींच्या वकिलांकडून आम्हाला आव्हान दिलं जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.
एकतर दोषींना फाशी द्या, नाही तर संविधान जाळा, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला आहे.
2012 मध्ये दिल्लीत चालत्या बसमध्ये सहा जणांनी या तरुणीवर बलात्कार केला होता.14 दिवस मृत्यू शी झुंज दिल्यानंतर निर्भया ने प्राण सोडले होते. या प्रकरणानंतर संपूर्ण देशात जनक्षोभ उसळला होता.

दोषींना फाशी द्या, नाही तर संविधान जाळा निर्भया च्या आईचा उद्रेक

16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीमधल्या रस्त्यावर एका बसमध्ये ही घटना घडली. या भीषण घटनेनंतर देशभरात नागरिक रस्त्यावर उतरले. दोषींना तत्काळ फासावर लटकवलं जावं अशी मागणी त्यावेळी जनतेकडून होत होती.
आता पुन्हा निर्भया च्या दोषींना शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणावी या साठी पुन्हा रस्त्यावर जनता उतरेल का/फक्त मेणबत्या पेटवून निर्भया ला न्याय मिळेल का?निर्भया ची आई एकटी च लढाई लढत आहे या लढ्यात सर्व सामान्य मेणबत्ती पेटवणारी जनता त्यांना साथ देईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button