Faijpur

CAA, NRC व NPR विरोधात फैजपूर शहर कडकडीत बंद

CAA, NRC व NPR विरोधात फैजपूर शहर कडकडीत बंद

सलीम पिंजारीफैजपूर । प्रतिनिधी

राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात सर्व पक्षीयांच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला फैजपूर शहरात चांगला प्रतिसाद मिळाला.
फैजपुर शहरातील छोट्या – मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभाग घेतला. शाळा, रुग्णालये, औषध दुकाने, बँका इ. अत्यावश्यक सेवा वगळता फैजपूर शहर कडकडीत बंदमुळे इतर व्यवहार ठप्प झाले आहे. फैजपूर शहर कळकळीत बंदमूळे शांतता ठेण्यात आल्याने कोणताही अनसुचित प्रकार घडला नसल्याचे चित्र आहे.CAA, NRC व NPR विरोधात फैजपूर शहर कडकडीत बंदसर्व पक्षीयच्या वतीने आज बुधवारी पुकारलेल्या भारत बंदला फैजपूर येथील व्यापारी व शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. फैजपूर शहरातील छोट्या – मोठ्या व्यावसायिकांनी सकाळपासूनच आपापली दुकाने बंद ठेवली होती. यामध्ये सुभाष चौक, कै. बळीराम वाघुळदे कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाजार पेठ, सरदार वल्लभभाई पटेल कॉम्प्लेक्स तसेच मुख्य शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून भारत बंद मध्ये सहभाग घेतला.केंद्र सरकारने सीएए आणि एनआरसी हा कायदा घटनेविरूध्द लागू केला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजच नाही तर हिंदु समाजातील मोठा घटक व बहुजन समाज बाधीत होणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने शांततेत बंद पाळण्याचे आवाहन सर्व पक्षीयांच्या वतीने करण्यात आले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.दरम्यान, फैजपूर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथील एपीआय प्रकाश वानखेडे पीएसआय योग्य शिंदे फौजदार विजय पाचपोळ पोलीस कर्मचारी मालविया इकबाल सय्यद उमेश पाटील राजेश मराठे मोहन लोखंडे पीएसआय जिजाबराव पाटील यशवंत टाकळे सांगळे आधी पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button