शेतकरी बांधव या देशाच्या झाडाची मुळ आहेत — मकरंद अनासपुरे
मनोज गोरे चंद्रपूर
शेतकरी बांधवांच्या जिवणात महत्वाचा आणि घातक बद्दल कोणता आहे तर ग्लोबल वार्मिंग. हवामानावर दुष्परीणाम होत आहे. पाऊस कधी पडणार हे आता सांगताच येत नाही. म्हणून पाण्याचे जपुण वापर करा. त्याचा नियोजन करा आणि शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन काम करा. आज जर आपण शेतकरी बांधवांना उभा केला नाही तर याची किंमत आपल्याचाच मोजावी लागेल. शेतकरी बांधव या देशाच्या झाडाची मुळ आहेत. मुळ जेवळी पक्की करता येतील तेवढा देश पक्का होईल हा साधं गणित आहे. असे मराठी सिनेअभिनेते तथा नाम फॉंऊंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे हे मूल येथिल कार्यक्रमात शेतक—यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
जलसंपदा विभागाच्या आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग मुल व सावली कार्यालयाच्या वतीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर तसेच मंुबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था स्वायत्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुल येथिल मा. सा. कन्नमवार सभागृह येथे शेतक—यांसाठी पाणी वापर संस्था व सहभागी सिंचन व्यवस्थापन या विषयावर पाणी वापर संस्थाच्या पदाधिका—यांसाठी मार्गदर्शनास्तव एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नाम फाउंडेशनचे संस्थापक तथा सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे, अध्यक्षस्थानी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे होते तर गोसीखुर्द प्रकल्प मुख्य अभियंता जिब्राईल शेख, गोसीखुर्द प्रकल्प अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, श्रीकांत बाराहाते, कार्यकारी अभियंता राजेश बगमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेत पाणी व शेतीशी निगडित विविध विषयावर उपस्थितांनी मार्गदर्शन करण्यात आले. पोंभुर्णा तालुक्यातील 2 हजार स्वेअर फुट जागा पाणी व्यवस्थापन समितीच्या कार्यालयासाठी दान देणा—या साईनाथ तलांडे या शेतक—याची दखल घेत मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच विविध तालुक्यातील पाणी व्यवस्थापन समितीचे पदाधिका—यांचे तसेच प्रगतशील शेतक—यांचे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मुल, पोभुर्णा, गोंडपिपरी, सावली आदी तालुक्यातील पाणी व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.






