बाल आनंद मेळाव्यात खवय्येगिरांची खवय्येगिरी व लोकसहभागातून स्वेटर वाटप कार्यक्रम
प्रतिनिधी मुबारक तडवी
मोठा वाघोदा ता.रावेर
दिनांक २२ जानेवारी , २०२० रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा केंद्र . धनाजे बु ता. धडगाव जि. नंदुरबार येथे शाळेचा बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच याच कार्यक्रमात शाळेच्या शिक्षकांनी मिळून लोकसहभागातून मिळवलेल्या स्वेटर वाटप करण्यात आला.

सर्वप्रथम बालसंसदेच्यावतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेची उपमुख्यमंत्री कुमारी मनीषा अंधाऱ्या पावरा हिने केला. संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या बाल संसदेच्या पहिली मुख्यमंत्री कु. मोगी रमेश पावरा या होत्या. मुख्याध्यापक श्री. रुपेशकुमार नागलगावे सर यांनी प्रस्तावनेत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
शाळेच्या शिक्षकांनी मिळून शाळेच्या मुलांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी भागातील मुलांना स्वेटर मिळावा असे आवाहन केले असता जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. बघता बघता अनेक लोकांनी आर्थिक मदत केला. उमराणी, धडगाव, नाशिक, सोलापूर, लातुर, अक्कलकोट, औरंगाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई, पुणे या भारतातील नव्हे तर अमेरिका, झांबिया , सिंगापूर, दुबई या परदेशातील मित्रांनीही सढळ हाताने मदत केली. यासाठी सर्वाधिक म्हणजे 20,000 /- रु. ची आर्थिक मदत श्री. चंद्रकांत मसूती रा. अक्कलकोट जि. सोलापूर यांनी केला आहे.
सदर स्वेटर वाटप धडगाव तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार मा. श्री. ज्ञानेश्वर सापकाळे साहेब, धडगाव तालुक्याचे सन्माननीय गटविकासअधिकारी मा. श्री. चंद्रकांत बोडरे साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. जे एन चौरे साहेब तसेच पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या सौ. शोबीबाई फत्तेसिंग पावरा यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन धडगाव तालुक्याचे सन्मानीय तहसीलदार श्री. ज्ञानेश्वर सापकाळे साहेब, गटविकास अधिकारी श्री. बोडरे साहेब , गटशिक्षणाधिकारी श्री. जे. एन. चौरे साहेब यांनी स्वतः बाजारात खरेदी करून केले. बालमेळाव्यात उपस्थित अधिकारी वर्ग यांनी बाजरीच्या भाकरी व उडीदाच्या डाळी प्लेट खरेदी करून मनसोक्त ताव मारला. यातील प्रमुख आकर्षण सुरेश कडकनाथ कोंबडी दुकान, ओल्ड फ्रेंड्स नाष्टा सेन्टर यांनी लक्ष वेधून घेतलं.
बाल आनंद मेळावा हा विद्यार्थांना शिक्षणासोबत व्यावसायिक दृष्टीकोन आणि मनोरंजन या हेतूने आयोजित केला जातो. आज या मेळाव्यात चिमुकल्यांनी अनेक गावरान मेव्यासोबत भजे, पोंगे, बोरे, हरभरा, शेंगा, भेंडी, वांगे, पिण्यासाठी सरबत , कडीपता असे अनेक खाद्यपदार्थ विक्रीला आणले होते.. काही मुलं ही पारंपरिक वेशभूषेत आलेल्या मान्यवरांचे स्वागत करत होते. मुलांचा चेहऱ्यावरचा उत्साह पाहून पालक, अधिकारी वर्ग आणि शिक्षक समाधानी असल्याचे दिसून आले. सदर बाल आनंद मेळाव्यात जि. प शाळा उमराणी बु, जि. प. शाळा लहानखर्डीपाडा, जि. प शाळा उमराणी खु, जि. प शाळा डुमटीपाडा, जि प शाळा आमला, या शाळेतले विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांनी सहभाग नोंदवत मनसोक्त आनंद लुटला.

श्री. चौरे साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना मुलांना अभ्यासासोबत अशा मनोरंजक व आनंददायी मेळाव्यातून व्यावहारिक ज्ञान शिकवता येतो. प्रगल्भ समाज निर्मितीस मदत होतो , असे मत व्यक्त केले. मा.श्री. चंद्रकांत बोडरे साहेब यांनि मार्गदर्शन करताना शाळेच्या एकूण यशाचा गौरव करताना मदतीचा हात देणाऱ्या दात्यांचेही मनापासून गौरव केला. शाळेचा यश हे समाजाच्या सहभागावर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे उल्लेख करताना बाल ससंदेच्या मुलांना शाळेने दिलेल्या संधीचे ही मनःपूर्वक कौतुक केला. तसेच शाळेला संगणक कक्षासाठी एक संगणक मिळवून देण्याचा आश्वासन दिला.
मा. श्री. सापकाळे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सातपुड्याच्या डोंगररांगेत दुर्गम भागात सुद्धा शिक्षक व समाज एकत्र येऊन निर्माण केलेल्या या शाळेच्या यशाचा गौरव केला. आपल्या कडून ही 2000/- निधी देताना शाळेला व विद्यार्थ्यांना कोणतीही मदत लागल्यास हाक देण्याची विनंती केली. बाल आनंद मेळाव्यात पालकांच्या उत्साहाचे विशेष उल्लेख केला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उमराणी गावच्या सरपंच श्रीम. आशाबाई वंतीलाल पावरा, सिसा बिटाचे शिक्षण विस्ताराधिकारी श्री. शिलवंत वाकोडे साहेब, मांडवी बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. योगेश सावळे साहेब, राजबर्डी बिटाचे शिक्षण विस्ताराधिकारी श्री. डी डी राजपूत साहेब, केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. बी डी पाडवी साहेब, श्री. सागर धनेधार (ग्यानप्रकाश फाऊंडेशन, धडगाव समन्वयक) , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. तेरसिंग पावरा हे उपस्थित होते. यावेळी डॉ.राजपाल यादव, प्रा बटेसिंग पावरा , चेतन पावरा , तेगा पावरा सर यांनी मनोगत व्यक्त केला. यावेळी शा. व्य.सदस्य, पालक, गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मनीषा अंधाऱ्या पावरा व श्री. लक्ष्मीपुत्र उप्पीन सर यांनी केला. सदर कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापक श्री रुपेशकुमार नागलगावे , शिक्षक श्री. तेगा पावरा, श्री. दशरथ पावरा , श्री. लक्ष्मीपुत्र उप्पीन तसेच गावातील युवा मित्र मंडळ, पालक , व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले.






