मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर ला प्रचंड प्रतिसाद
सावली सोशल फाऊंडेशन चा उपक्रम
चंद्रपूर प्रतिनिधी -मनोज गोरे
सेवाग्राम मेडिकल कॉलेज,आरोग्य विभाग चंद्रपुर, लायन्स क्लब,चंद्रपुर महाकाली महावीर इंटरनेशनल व सावली सोशल फाऊंडेशन च्या वतीने आज सावली येथील विश्व शांती विद्यालय येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर तसेच विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शत्रक्रिया शिबिर चे आयोजन केले होते. त्या मध्ये 510 रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती. गेल्या 8 वर्षांपासून सावली तालुक्यात ह्या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून त्याला उत्तम प्रतिसाद ही मिळत आहे.जण सेवा हीच ईश्वर कार्य मानून सावली सोशल फाऊंडेशन च्या वतीने या कार्याचे आयोजन करण्यात आले असून या शिबिर करीता तज्ञ डॉक्टर शुक्ला व त्यांची चमू यांनी तपासणी केली.त्यापैकी 300 रुग्णांना शस्त्रकियेसाठी निवड करण्यात आली. या शिबिरात सावली,मुल, सिंदेवाही तसेच गडचिरोली जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने आपल्या डोळ्यांची तपासणी करण्याकरिता आले होते.यावेळी सावली सोशल फाऊंडेशन चे संचालक प्रकाश खजांची,प्राचार्य संतप्रकाश शुक्ला,अशोक पोटवार,किशोर संगिळवार, मनोज ताटकोंडावार,सुरज बोम्मावार, प्रवीण झोडे,गुरुदास कोसरे,अतुल लेनगुरे,शंकर दिकोंडवार, प्रफुल बुटे,राहुल मेरुगवार,संदीप मेडपल्लीवार, किरण आकुलवार, अजय पोहनकार,जगदीश बन्सोड,महेश चौधरी,अमोल तिगलवार तसेच महावीर इंटरनेशनल चे नरपतचंद भंडारी, तुषार डगली,त्रिशूल बंब,विशाल कल्लूरवार यांनी अथक परिश्रम घेतले.






