Chandrapur

दारु तस्करीसाठी प्रवासी ऑटो चा उपयोग

दारु तस्करीसाठी प्रवासी ऑटो चा उपयोग

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे

शहरातील प्रवासी वाहतूक करण्यासाठी ऑटोचा बऱ्याचदा उपयोग केला जातो. पण सादीकचा आटो मात्र प्रवाशांची वाहतूक न करता दारूची वाहतूक करत होता. चंद्रपुर शहरात चालणारा ऑटो क्रमांक MH 34 BH 1484 हा वनी -वरोरा -चंद्रपूर असा चालायचा. ऑटोचालक हुशार असल्याने त्यामध्ये कधीच प्रवाशी बसवत नव्हता. पण मात्र वरोरा ठाण्यातील पोलीस निखिल कौरासे चौकात कर्तव्यावर असताना यांना ही बाब खटकली.

त्यांनी ऑटो थांबवण्यासाठी सांगितले. पण मात्र हा आटो खाली असून सुद्धा थांबायला तयार नव्हता. त्यामुळे संशयाची सुई पोलिसांच्या मनात आली. आणि पाठलाग सुरू केला. त्यानंतर झडती घेतल्यानंतर सिटच्या खाली बोटलानचा आवाज येऊ लागला. पोलिसांनी सादिक शेख राहणार चंद्रपूर याला पोलिसी हिसका दाखवताच पोपटासारखा बोलायला लागला. ऑटोला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले त्यानंतर सीट खाली असणार्या विदेशी दारूच्या पाच पेट्या हस्तगत करण्यात आल्या. एक मोबाईल, आणि ऑटो असा मिळून एकूण 180000रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला .
या कारवाईवरून दारू तस्करीची आणखी एक नवी शक्कल पुढे आली असून पोलिस देखील अचंबित झाले आहे.
पुढील कारवाई ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button