आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचेकडून शालेय विद्यार्थीनीला सायकल भेट
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे
नेहमी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय जीवनात पुस्तके व इतर आवश्यक गोष्टींसाठी भरीव मदत करणारे चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी वाढोना ता.नागभीड येथील रहिवासी कु.एशवर्या रामदास पुसतोडे या विदयार्थीनीला सायकल भेट दिली एशवर्या ही महात्मा फुले विद्यालय तळोधी तेथे शिक्षण घेत असून तिला येणे जाणे करण्याची सोय नसल्याने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सायकल भेट दिली.
यावेळी सायकल भेट देतांना श्री होमदेवभाऊ मेश्राम भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड,गणेशभाऊ तर्वेकर जि. प.प्रमुख,सचीनभाऊ आकुलवार सभापती नगरपरिषद नागभीड, शेरू वानखेडे,केदार मेश्राम, प्रदिप धकाटे, राजू पिसे,प्रवीण सुघारे उपस्थित होते.






