चिमूर येथे तारण योजनेचा शुभारंभ
चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून याचे उदघाटन सभापती माधव बिरजे यांच्या हस्ते करण्यात आले आहे
शेतकऱ्यांचे हिताकरिता मागील दोन वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती शेतमाल तारण योजना राबवित आहे यासाठी शेतकऱ्यांना आपले धान्य बाजार समितीत आणून ठेवायचे असून पुढील तीन ते चार महिन्यानंतर त्या मालाचा लिलाव होणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळत असल्याने या योजनेला शेतकऱ्याकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75% अग्रीम रक्कम देण्यात येणार आहे तसेच गोडाऊन चे भाडे सुद्धा घेण्यात येणार नसल्याने या योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी धान्य माला सोबत सातबारा आधार कार्ड व बँकेचे पासबुक आणने गरजेचा आहे मागील वर्षी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल चारशे रुपये नफा झाल्याने यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे सभापती बिरजे यांनी केले आहे आज पहिल्याच दिवशी मोठेगाव येथील यशवंतराव आरसुळे यांनी आपला धान्य आणल्यामुळे बाजार समिती च्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संचालक आमोद गौरकर धोटे सचिव घनश्याम ढोणे लेखापाल दिनेश काशीवार सारंग साळवे व इतर कर्मचारी उपस्थित होते






