“नाशिक येथील बालभारती भाङारगृहात बालभारतीची ९५ लाख पुस्तके
शांताराम दुनबळे
नाशिक-कोरोनाच्या पाश्वभुमीवर पुढील शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरु होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे . अशा परिस्थितीत शाळांना पुस्तकांचा पुरवठा कधी करणार , या आदेशाची प्रतिक्षा नाशिक येथील भाङारगृहातील पाठ्यपुस्तक बालभारतीला लागून आहे . परिणामी नाशिकच्या भांडारगृहात पहिली ते आठवी पर्यत तब्बल ९५ लाख ८ ९ हजार पाठ्यपुस्तके लॉकडाऊन झाली आहेत . विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याची प्रतिक्षा लागली आहे . परंतु , शाळा , महाविद्यालये सुरू होण्यास अजून महिना दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे संकेत आहेत . सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य अभ्यासमंडळाची पुस्तके मोफत दिली जातात ,नाशिक जिल्ह्यात 30 लाख 24 हजार ८२२ पुस्तके वितरीत केली जातील . विद्याथ्यांना बालभारतीची पुस्तके देण्यात येणार आहेत . मात्र , कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव तालुक्यातत पाठयपुस्तकांचे वाटप कसे करायचे , हा मोठा पेच निर्माण झाला आहे पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे आदेश मिळाल्यास सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या भागात वाटप सुरू होईल त्यानंतर हॉटस्पॉट च्या ठिकाणी पुस्तके पोहोचवण्यात येणार आहेत . प्रत्येक वर्षी साधारणतः मे महिन्यात वाटप सुरू होते आणि जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यांर्थाापर्यत पुस्तके पोहोचतात . कोरोनामुळे आता शाळा उशिरा उघडणार असल्याने पाठयपुस्तकेही पाठवण्यास उशिर होणार आहे . दि .१८ लाकडाऊनचे चौथे चरण सुरू झाल्याने यात भांडारगृहास पुस्तके वितरणास परवानगी मिळण्याची अपेक्षा लागून आहे .नाशिक येथील बालभारती भाङारगृहात सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील पहीली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात नाशिक जिल्ह्यात ३०लाख २४हजार ८९३,नाशिक शहरात ५लाख ९७हजार ५७३, मालेगाव तालुक्यात ५ लाख ७३ हजार ३२४,धुळे जिल्ह्यांत १२ लाख १४ हजार ५७३, धुळे महापालिका २ लाख ४७ हजार ८४९ ,नंदुरबार जिल्हा १२ लाख ४ हजार २७१, जळगाव जिल्ह्यात २५ लाख १४ हजार ३९८, जळगाव महापालिका २ लाख १२हजार ५३८ असे एकुण ९५ लाख ८९हजार ४१९ इतके पाठ्यपुस्तके लाॅकङावुन असल्याने पाठ्यपुस्तके वितरणाची परवानगी ही लाॅकङावुन संपल्यानंतर मिळेल अशी शक्यता आहे अशी माहिती बालभारती भाङारगृह व्यवस्थापक श्री पी एम बागुल यांनी दिली






