Mumbai

भांडुप मध्ये २३ वा भव्य “कोकण महोत्सव”

भांडुप मध्ये २३ वा भव्य “कोकण महोत्सव”

राहुल खरात
मुंबई— उत्सव परिवार श्री गणेश मित्र मंडळ व श्री समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून भांडुप पश्चिमेच्या कोकणनगर येथील स्व. मीनाताई ठाकरे मैदान, (BMC reserve plot) येथे, बुधवार, दिनांक ६ नोव्हेंबर ते शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर या कालावधीत कोकण नगर येथील अरुणोदय टॉवर येथे २३ वा भव्य कोकण महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत यांनी केले आहे. या महोत्सवात कोकणातील प्रसिद्ध दशावतार कंपन्यांची नाटके, विविध कोकणी नृत्य,नमन, भारुड, बालानृत्ये, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत नाटक, संगीत भजनाची डबलबारी,महिलांसाठी खेळ पैठण्यांचा, लोकरंग सांस्कृतिक मंच प्रस्तुत गणगौळण लावणी बतावणीचा कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध स्पर्धा,लहान मुलांसाठी फनफेअर होणार आहे. महोत्सवात कोकणातील मालवणी मसाले, मासळी, खाद्यपदार्थांचे स्टॉलही उभारले जातील, अशी माहिती कोकण महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत यांनी दिली यावेळी, उत्सव परिवाराचे अध्यक्ष सुजय धुरत, सुप्रिया धुरत,दिलिप हिरनाईक, सुरेश सावंत, संतोष राणे, विजय जोशी, प्रदीप भाबल, राज धुरत, दिपक धुरत, विनायक सनये,दिलिप परब, महोत्सवाच्या तयारीला लागले आहेत.
यावेळी आपल्या या आयोजनाबाबत सुजय धुरत म्हणाले की, कोकणाचे पर्यटन आणि खाद्य संस्कृती याला चालना देण्यासाठी भांडुप पश्चिममध्ये सलग २३ वा कोकण महोत्सव आयोजित केला जात असून, गेल्या वर्षाचे आयोजन पाहून यावर्षी नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्याच धर्तीवर सर्वांनी मिळून या महोत्सवाची तयारी सुरू केली आहे असे धुरत यांनी सांगितले.अधिक माहितीसाठी सुरेश सावंत ९५९४०८५७८८, दिलीप हिरनाईक ९९६९००६७७४,
विनायक सनये ९९३०३७०४३७,
दिलीप परब ७२०८१२१८१८ यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन सुजय धुरत यांनी केले आहे.

धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे
९०८२२९३८६७

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button