Nashik

“”करोनाविरुद्धच्या लढ्यात ७० हजार शिक्षक सहभागी “

“”करोनाविरुद्धच्या लढ्यात ७० हजार शिक्षक सहभागी “

प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा आणि शैक्षणिक कामकाज ठप्प असताना राज्यभरातील सुमारे ७० हजारांहून शिक्षक कोरोना विरुद्धच्या लढ्यात संसर्गाचा धोका पत्करून पीपीई किट वाटप , सर्वेक्षण अशा कामांची जबाबदारी निभावत आहेत . राज्यात दिवसेंदिवस करोना विषाणू बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे . त्यामुळे विविध प्रकारची कामे करण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्यात येत आहे . राज्यभरातील करोनाबाधित जिल्ल्यांमध्ये शिक्षक काम करत आहेत . एकीकडे काही शिक्षक विद्याथ्यांशी संवाद साधून अध्यापनाचे काम करत आहेत , तर सुमारे वीस हजार शिक्षक कोरोना विरुद्ध लढ्यात प्रत्यक्ष कार्यरत आहेत .

त्यात जिल्हा परिषद शाळा , महापालिका , खासगी शाळांतील पुरुष आणि महिला शिक्षक यांचा समावेश आहे . एकीकडे जनगणना , निवडक अशी अशैक्षणिक कामे करणारे शिक्षक सध्याच्या अवघड काळातही मागे नाहीत . कोरोना संसर्गाचा धोका शिक्षक पत्करून प्रशासनाला हातभार लावत आहेत . प्राथमिक विभागातील सुमारे ५७ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दतात्रय जगताप यांनी दिली . या कार्यात माध्यमिक विभागातील १५ हजार शिक्षकांचा समावेश असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले . दोन्ही संचालनालयाकडून कोरोना काळात प्रत्यक्ष काम करत असलेल्या शिक्षकांची माहिती संकलित करण्यात आली आहे . तपासणी नाके , स्वस्त धान्य दुकाने , निवारगृहे , विलगीकरणासाठीच्या शाळा या ठिकाणी लक्ष ठेवण्यासह स्वसंरक्षण साहित्य संच वाटप , आजारी नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेशन अशा कामांची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button