वैजापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या ,,
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
तालुक्यातील वैजापूर येथील दोन अल्पवयीन आदिवासी मुलीवर काल देवेंद्र मोरे या नराधमाने ज्या दोन आदिवासी मुलींवर लेंगिक अत्याचार केला त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे आज करण्यात आली ,दि 13 रोजी वैजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता अनिल बारेला यांच्या 7 व 5 वर्षीय अल्पवयीन मुलींवर
लेंगिक अत्याचार करण्यात आला, ही घटना कर्जाने रस्त्यावर त्या मुली खेळत असताना त्यांना या नराधमाने काळ्या रंगाच्या बिनबाहीचा बनियान घातलेला व्यक्ती मोटरसायकल वर ये जा करत होता.काही वेळा नंतर या मुली घरापासून हाकेच्या अंतरावर सुरमल बारेला हे शेतातून आपल्या मोटरसायकल ने पत्नी सह शेतातून परत येत असताना त्यांना एक मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. ती मुलगी ओरडत होती कुणी असेल तर वाचावा त्यावेळेस सुरमल बारेला यांनी आवाजाच्या दिशेने त्या मुली कडे गेले.तोपर्यंत तो नराधम पळून जाण्यात यशस्वी झाला. तरी संमधित नराधम देवेंद्र भोई याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थीनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर खालील सह्या आहेत.ऍड जामसिंग बारेला,दारासिंग पावरा,माजी प स सभापती गोपाळ सोनवणे, समाधान सपकाळे,समाधान सोनवणे, जेमराय पावरा, नामसिंग पावरा, दिनेश पावरा,साहेबराव पावरा, महेंद्र पावरा,संजय पाडवी,देवळा पावरा अंजली पावरा,बबिता पावरा, गीता पावरा,भारती पावरा,सुनीता पावरा,रंजना पावरा, कालुसिंग पावरा यांच्या सह्या आहेत.







