India

3.0 Update: सर्वात मोठं मंत्री मंडळ पण एकही मुस्लिम मंत्री नाही..! स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच घडला असा प्रकार..!

3.0 Update: सर्वात मोठं मंत्री मंडळ पण एकही मुस्लिम मंत्री नाही..! स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच घडला असा प्रकार..!

दिल्ली नुकतीच नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्याबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या 71 जणांनी केंद्रीय मंत्री परिषदेसाठी शपथ घेतली.

गेल्या दोन टर्मची तुलना केल्यास, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारमधील आतापर्यंतची ही सर्वात मोठी मंत्री परिषद आहे.मात्र या प्रथमच भारताच्या इतिहासात एकाही मुस्लिम खासदाराने केंद्रीय मंत्रिपरिषदेसाठी शपथ घेतली नाही.
ह्या घटनेची नोंद देखील इतिहासात झाली आहे.भाजप च्या मते धर्म किंवा जातीच्या आधारावर तिकिटांचे वाटप करण्यात आले नाही.18 व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने एकूण 240 जागा जिंकल्या. मित्रपक्षांसह त्यांच्या लोकसभेत 293 जागा आहेत.पंतप्रधानांसह ७२ जणांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. त्यापैकी 61 भाजप आणि 11 एनडीए घटक पक्षांचे आहेत.

2014 नंतर एनडीएच्या मंत्र्यांची ही सर्वात मोठी संख्या आहे. 2014 मध्ये एकूण 46 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यापैकी 24 कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते .2019 मध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 57 झाली .मात्र, यावेळी इतिहासात पहिल्यांदाच नव्या सरकारच्या शपथविधीवेळी एकाही मुस्लिम चेहऱ्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याची टीका केली जात आहे.

भाजपच्या पहिल्या दोन टर्ममध्ये एका मुस्लिम व्यक्तीला केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री करण्यात आले होते.2014 मध्ये डॉ. नजमा हेपतुल्ला यांना केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री करण्यात आले. माजी राज्यसभा खासदार नेजमा हेपतुल्ला सध्या मणिपूरच्या राज्यपाल आहेत.2019 मध्ये, PM मोदींनी पक्षाचे राज्यसभा खासदार मुख्तार अब्बास नकवी यांना अल्पसंख्याक व्यवहार विभागाची जबाबदारी दिली होती.त्यांनी 2022 मध्ये तीन वर्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर स्मृती इराणी यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की 2022 पासून, 2024 च्या निवडणुकीपूर्वी भाजप सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री नाही किंवा संसदेच्या कोणत्याही सभागृहात एकही मुस्लिम खासदार नाही. आणि नवीन मंत्री मंडळात त्यांना स्थान नाही.या नवीन मंत्रिमंडळात अल्पसंख्याक समाजातील 5 नेत्यांना संधी मिळाली आहे.

यंदा बौद्ध धर्मीय असलेल्या किरेन रिजिजू यांना अल्पसंख्याक व्यवहार खात्याचे केंद्रीय मंत्री करण्यात आले आहे. किरेन रिजिजू यांच्यासोबत जॉर्ज कुरियन यांना त्यांच्या खात्यातील कनिष्ठ मंत्री म्हणून राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जॉर्ज कुरियन हे ख्रिश्चन आहेत.

याशिवाय देशभरातील विविध विधानसभांमध्ये भाजपचे एक हजाराहून अधिक आमदार असले तरी एकच मुस्लिम आमदार असल्याची वस्तुस्थिती आहे.

2011 च्या जनगणनेनुसार , देशातील लोकसंख्येमध्ये मुस्लिमांची संख्या 17.22 कोटी आहे आणि एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा सहभाग 14.2 टक्के आहे.

अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत 24 मुस्लीम खासदार निवडून आले आहेत, त्यापैकी 21 हे विरोधी आघाडी ‘इंडिया’च्या घटक पक्षांचे आहेत. उर्वरित 3 खासदार हे कोठे गेले? हा ही प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button