? Big Breakingरावेर येथे दोन गटात तणाव …दोन्ही गटाकडून दगडफेक
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
रावेर शहरात छ.शिवाजी महाराज
चौकात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली.
आज कोरोना लागणच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात जनता कर्फ्यु लागू असतांना रावेर येथे झालेल्या दगड फेकी मुळे शहरासह जळगांव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान घटनास्थळी स्थानिक पोलीस गेले असून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती नुसार संपुर्ण जिल्ह्यात शासनाच्या आदेशा नुसार संचरबंदी लागू करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर संपुर्ण जिल्हातून या जनता सामूहिक बंदला चांगला प्रतिसादही जिल्हा भरातून मिळाला.मात्र आज रात्री रावेर शहरात छ शिवाजी महाराज चौकात ८.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली.
या दगडफेकमुळे प्रचंड प्रमाणावर
खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे.आणि दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे हे तात्काळ आपल्या पथकासह घटनस्थळी दाखल झाले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.






