India

? कोरोना पेक्षा भयंकर आजार झेनोफोबिया…वंश,वर्ण,जातीवादा कडे झुकणारा…मानसिक आजार

? कोरोना पेक्षा भयंकर आजार झेनोफोबिया…वंश,वर्ण,जातीवादा कडे झुकणारा…मानसिक आजार

प्रा जयश्री दाभाडे

सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणू मुळे पसरणारा संसर्गजन्य आजारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याही पेक्षा कोरोना च्या आडून जो वंश,वर्ण आणि जातीभेद निर्माण करून सामाजिक,धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे ती ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या भेदा पेक्षा ही मोठी आहे. यापूर्वी ही अनेक परकीय वंशाच्या लोकांनी उदा आर्य भारताच्या मूलनिवासी असलेल्या अनार्यांना वेशी बाहेर ठेवलं हा इतिहास आहे. इथूनच वंश भेदाची वर्ण भेदाची सुरुवात झाली. आणि पुढील काळात एक मानसिक वैचारिक स्रोतात परिवर्तित झालेली अवस्था आहे असे म्हणता येईल. यालाच मानस उपचार भाषेत किंवा मानस शात्रीय भाषेत आधुनिक काळात झेनोफोबिया असे म्हणतात.

झेनोफोबिया हा ग्रीक शब्द आहे. ज्याचा अर्थ “अनोळखी” किंवा “परदेशी” आणि फोबॉस, ज्याचा अर्थ “भीती” आहे, म्हणजे परदेशी किंवा विचित्र असल्याचे समजले जाणारे भय किंवा द्वेष.

? कोरोना पेक्षा भयंकर आजार झेनोफोबिया...वंश,वर्ण,जातीवादा कडे झुकणारा...मानसिक आजार

विविध गटसमूह आणि यांच्यामधील मानसिक आणि वैचारिक संघर्ष ते एखाद्याच्या क्रिया,हालचाली भाषा,देहबोली, इ द्वारे प्रकट होतात. त्यांची एकमेव भीती असते ती म्हणजे राष्ट्रीय, वांशिक किंवा वांशिक ओळख गमावण्याची …..आपली ओळख ते वारंवार आपल्या कृती तुन बोलण्यातून दाखवत असतात.

झेनोफोबिया आणि वंशविद्वेष बर्‍याचदा ओव्हरलॅप होतात परंतु त्यात फरक आहे हे या व्यक्तींच्या लक्षात राहत नाही.

? कोरोना पेक्षा भयंकर आजार झेनोफोबिया...वंश,वर्ण,जातीवादा कडे झुकणारा...मानसिक आजार

?? सायकॉलॉजीमध्ये ह्या स्थितीला झेनोफोबिया (xenophobia)म्हणतात. म्हणजे सतत परकीय व्यक्तींचा, त्यांच्या कल्चरचा द्वेष करत राहणं. आता यात परकीय म्हणजे आपल्याला सर्वसामान्य पणे दुसऱ्या देशातले म्हणजे परकीय अस नाही जे आपल्यासारखे नाहीत त्यांचा सतत द्वेष करत राहणे, त्यांच्याबद्दल सतत हिंसक आणि द्वेषपूर्ण बोलत राहणे म्हणजे xenophobia.

झेनोफोबिया ही एक सामाजिक मानसिक स्थिती असते असं अगदी अलिकडेपर्यंत बद्दल लोकांना वाटायचं. पण आता याबद्दल खूप संशोधन होऊ लागलं आहे. हे जे सतत द्वेष करत असणं असतं ती केवळ एक सामाजिक स्थिती नसून हा त्या व्यक्तीला जडलेला मानसिक आजारच असतो.

समाजात जो वंशवाद म्हणजे racism वाढतो तो या xenophobia चा सामाजिक आविष्कार असतो. पण हा आजार तेवढ्यावर मर्यादित रहात नाही. हा व्यक्तींना होतो. यातून हळूहळू त्या माणसाच्या आधी मनावर आणि नंतर शरीरावर परिणाम होऊ शकतात. म्हणजे xenophobic समाजच फक्त रोगट असतात असं नव्हे तर ती व्यक्तीसुद्धा वैयक्तिक पातळीवर रोगट बनू शकते.

माझ्या बघण्यात काही जण आहेत. जे मी हिरव्या रंगाचा शर्ट घातला तरी आज नमाज पडलेत का म्हणून विचारतात. किंवा निळ्या रंगाचा शर्ट घातला तर जय भीम म्हणतात. हा निव्वळ दूषित पूर्वग्रह नाहीये. हा आजार आहे. रोगट झाल्याचं लक्षण आहे.

दुसऱ्या बाजूने हे जातीय पातळीवर पण असतं. म्हणजे आडनाव बघून, हां तो असाच असणार वगैरे म्हणायची पण एक पद्धत आहे. यात कोणतेच मोठेपण नाही किंवा कौतुक तर नाहीच नाही. हा आहे फक्त एक आजार.

? कोरोना पेक्षा भयंकर आजार झेनोफोबिया...वंश,वर्ण,जातीवादा कडे झुकणारा...मानसिक आजार

कोरोना जेव्हा चीनमध्ये थैमान घालत होता तेव्हा ‘टाईम’ या साप्ताहिकात सोनल शाह नावाच्या एका सायन्स पत्रकाराने लेख लिहिला होता. The pandemic of xenophobia and scapegoating म्हणजे झेनोफोबियाची महामारी आणि बळीचे बकरे. यात युरोपियन देशांत निव्वळ चीन नाही तर आशियाई देशांच्याच विरोधात कशी मोहीम सुरू केली गेली याबद्दल त्यांनी लिहिलं होतं.

प्लमएक्स मेट्रिक्स हे रसायन उद्रेक भय निर्माण करतात आणि वंशविद्वेष आणि झेनोफोबिया विकसित होण्यासाठी भीती ही एक महत्वाची सामग्री आहे. कोरोनाव्हायरस रोग २०१९ कोविड साथीच्या आजारांमुळे समाजात सामाजिक आणि राजकीय भगदाड पडला आहे, या भीतीपोटी जातीयवादी आणि भेदभाववादी प्रतिसाद मिळाल्यामुळे दुर्लक्षित गटांवर परिणाम होतो.

सांगायचा मुद्दा हा की अश्या लोकांना आपण नीट समजावून सांगायला हवं. की तुम्ही जे वागत आहात तो आजार आहे, मानसिक आजार आहे आणि असेच वागत राहिलात तर तुम्हांला शारीरिक इजाही यातून होऊ शकते. या माणसांना विरोध करता करता काही जण अश्या लोकांचा द्वेष करू लागतात हीपण एक वस्तुस्थिती आहे. म्हणजे हेही त्याच आजाराला बळी पडतात.

झेनोफोबिया राजकारणात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कारण माणसाच्या मनात भीती असते आणि त्या भीतीला न्यूनगंडात ढकलण्याचं काम झेनोफोबिया करतो. सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भात भेदभावाची कृत्ये घडतात. राजकीय नेत्यांनी वंशाचा भेदभाव करण्यासाठी कोविड -१९ संकटांचा गैरवापर करत आहेत

आरोग्य संरक्षण केवळ सार्वभौमिक कव्हरेज असलेल्या चांगल्या कार्य करणार्‍या आरोग्य प्रणालीवरच अवलंबून नाही तर सामाजिक,वैचारिक,मानसिक अवस्थेवर , समावेश, न्याय आणि एकता यावर देखील अवलंबून आहे. या घटकांच्या अनुपस्थितीत, असमानता वाढविली जातात आणि तिला बळी पडणे कायम राहते,समाज बळी पडत राहतो,मन भीती युक्त होत राहतात आणि मानसिक स्थिती निर्माण होत राहते. यातून वंश,वर्ण आणि जातीभेद निर्माण होत राहतात.

कोरोनामुळे एका मोठ्ठ्या वर्गाला सक्तीची का होईना पण सुट्टी मिळाली आहे. ह्या काळात कंटाळा खूप येतो. आपल्याला सगळ्यांनाच येतो. पण तो येऊन गेला की जो वेळ हाती असतो तेव्हा एक व्यक्ती म्हणून आपण आपल्यातच उतरून बघायला पाहिजे. ही पण एक संधी आहे. आपल्या आयुष्याकडे, आपल्या जाणिवांकडे, आपल्या विचारांकडे बघण्याची. त्यातून द्वेष काढून टाकून प्रेम भरण्याची. माणूस म्हणूनच एक दुसऱ्याला बघायला लागण्याची. जगात शेवटी फक्त माणूस उरतो. धर्म, जात, प्रांत, देश, खंड असं सगळं सगळं सगळं बाजूला ठेवून माणसाला माणसाने हात देण्याचा आणि वाचवण्याचा काळ दर शे दीडशे दोनशे वर्षांनी इतिहासात आलेला आहे. यालाच इतिहासाची पुनुरावृत्ति असे म्हणतात.आताचा तो काळ आहे. यातून जेव्हा आपण बाहेर येऊ तेव्हा एका निरोगी, स्वच्छ आणि प्रेमयुक्त जगात आलेले असू हे स्वप्न यानिमित्ताने आपण सगळ्यांनीच बघितलं पाहिजे.

माणूस फक्त आशेवर आणि उत्कर्षाच्या स्वप्नांवरच इथवर आलाय. इथून पुढेही तो याच जोरावर जाईल!

संदर्भ….

Dr Ashturkar,Psychology,pune

lanclet journal प्रकाशितः 01 एप्रिल, 2020DOI: https: //doi.org/10.1016/S0140-6736 (20) 30792-3

संबंधित लेख

3 Comments

  1. सन्मानीय संपादक मॅडम, आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील लोकांना लागलेल्या *धर्म-जात द्वेष* या रोगाला ओळख दिली ती म्हणजे झेनोफोबिया ग्रस्त माणूस अथवा धर्म.

    आजकाल तर एखाद्या जातीला अथवा धर्माला बदनाम करण्याची विकृत मानसिकता तयार होत चाललेली प्रखरपणे दिसून येत आहे.

    माझा धर्म – माझी जात, कशी श्रेष्ठ आहे आणि बाकीचे कसे नीच आहेत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न कसोशीने केला जात आहे.

    आजचा माणसाची वागणूक ही दोन तोंडी सापा सारखी आहे. ” “मुंह में राम ओर बगल में छुरी” अशी झाली आहे.

    सापा पेक्षा माणसाचे विचार जास्त विषारी आहेत. तो स्वतःच्या जातीला म्हणजेच माणसाला सुद्धा गिळणकृत करीत आहे.(उदा धर्माच्या नावावर दंगली घडवून माणूसच माणसाचा खात्मा करत असल्याचे दिसून येत आहे)

    जगा सह भारतात संत(संत नामदेव, संत रोहिदास, संत तुकाराम, संत जगनाडे, संत चोखोबा, संत गुरुनांनकजी, संत गाडगेबाबा, संत कबीर , संत भीमा भोई आदी. ) आणि महापुरुषांनी (तथागत गौतम बुद्ध, शाक्यमुनी महावीर, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, बडोदा चे सयाजीराव गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीमाई फुले, आदिवासी नायक बिरसा मुंडा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पेरियार स्वामी, आदी.) देशात खऱ्या अर्थाने माणुसकी प्रस्थापित करण्यासाठी वेळ प्रसंगीं आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे, त्यांना धर्माच्या ठेकेदारांच्या प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले आहे.

    आता तर भारतात लोकशाहीच्या समता-स्वातंत्र-बंधुता-न्याय-धर्म निरपेकक्षता या मूल्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी व जातीय द्वेषात्मक मूल्य रुजविण्यासाठी एक विशिष्ट वर्ग ज्याला आपण आर्य म्हणतो तो सातत्याने प्रयत्न करीत आहे. तुमच्या म्हणण्यानुसार या वर्गातच झेनोफोबिया हा गंभीर रोग झाल्याचे दिसून येईल.
    या विषयावर लिहावे तेव्हढे कमीच आहे. आपण हा विषय वाचकांना समोर ठेवून माणसाच्या माणुसकीला जागृत करण्याचे काम केले आहे, आपले मनापासून आभार व मनस्वी कौतुक.
    प्रा विजय गाढे
    पत्रकार

  2. मुळातच आर्य अनार्य ही theory ब्रिटिशांनी आपल्यात फुट पडण्यास दिली होती एकीकडे तुम्ही आर्य विदेशातून आले म्हणतात त्यांचा द्वेष करतात आणि जे खरच विदेशातून आक्रान्त आले त्यांची बाजू घेतात

Leave a Reply

Back to top button