? ठोस प्रहारचा दणका…चांदवड चौफुलीवर गतिरोधक बसविण्यास सुरुवात,सिग्नल मात्र बंदच
चांदवड उदय वायकोळे
चांदवड शहरात एन्ट्री करताना पेट्रोलपंप चौफुली परिसरात गतिरोधक नसल्याने देवीमाथ्याच्या घाटातून येणारी वाहने जलद गतीने येत होते,यातच काही दिवसांपूर्वी ठोस प्रहार ने चौफुलीवरील अपघात व वाहतूक संबंधी बातमी प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता.
त्यानुसार आज रेणुका देवी घाट उतरल्यानंतर गतिरोधक बसविण्याचे काम सुरुवात झाले असून चौफुलीपर्यंत काम करण्यात येत होते.
अजूनही पेट्रोल पंप चौफुलीवरील सिग्नल यंत्रणा मात्र बंद असून ती सुरू करणे अपेक्षित आहे असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत






