Mumbai

? मोठी बातमी..राज्यात तीन आठवड्यांचा कडक लोकडाऊन ? विजय वडेट्टीवार यांचे संकेत

? मोठी बातमी..राज्यात तीन आठवड्यांचा कडक लोकडाऊन ? विजय वडेट्टीवार यांचे संकेत

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात विकेंड लॉकडाऊनऐवजी तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार आहे. शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांचा कडक बंद करण्यात येत आहे. मात्र, सद्यस्थितीत हा विकेंड लॉकडाऊन उपयोगाचा नसून 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावाच लागेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

राज्यात भविष्यात संपूर्णत: लॉकडाऊन करावाच लागणार आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेवरही निर्बंध आणावे लागतील. कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही कितीही उपाययोजना केल्या, तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे
डॉक्टर कमी पडतील, नर्स कमी पडतील हे आणणार कुठून. जी व्यवस्था, आता साडे पाच हजार डॉक्टर अंतिम परीक्षा पास होतील, त्यांना आम्ही कामाला लावतो. पीजी वाल्या विद्यार्थ्यांचीही सेवा आम्ही घेणार आहोत. आपल्याकडे यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळेच, विकेंडऐवजी कडक लॉकडाऊनची विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय महाराष्ट्रात आपण निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. कारण, राज्यात कोविडचा धोका वाढलेला आहे. त्यामुळेच, आज तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, असे वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे, लवकरच राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button