India

?️ महत्वाचे…व्हाट्सअप ने आणले नवीन फिचर..जुने मेसेज होतील आपोआप डिलीट…

?️ महत्वाचे…व्हाट्सअप ने आणले नवीन फिचर..जुने मेसेज होतील आपोआप डिलीट…

जगभरात कोट्यवधी युझर्स मेसेज, फोटो, व्हिडीओ शेअरिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन फीचर देण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील व्हॉट्सअ‍ॅपने नवं फीचर लाँच केले आहे. Disappearing Messages असे या फीचरचे नाव आहे. या महिन्याच्या शेवटी युझर्सना या फीचरचा लाभ घेताना येणार आहे.

Disappearing Messages फीचर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमधील जुने मेसेज आणि चॅट्स ऑटोमॅटिक डिलीट करेल.

WhatsApp ने शेअर केली माहिती

फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने फेसबुकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या नवीन फीचर बद्दल माहिती शेअर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Disappearing Messages फीचर युझर्सचे मेसेज वाचुन झाल्यावर काही काळानंतर ऑटोमॅटिक डिलीट करेल.
Disappearing Messages या फीचरच्या साहाय्याने व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसेज 7 दिवसांच्या आत ऑटोमॅटिक डिलीट होतील. हे फीचर Gmail, Telegram आणि Snapchat वर उपलब्ध असलेल्या फीचर प्रमाणे काम करेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button