Maharashtra

?️ कोरोना अपडेट..लॉक डाऊन 4.0…पहा 31 मे पर्यंत काय राहील सुरू आणि काय राहील बंद…

?️ कोरोना अपडेट..पहा 31 मे पर्यंत काय राहील सुरू आणि काय राहील बंद…

केंद्र सरकारनं लॉकडाऊनची मुदत 31 मे 2020 पर्यंत वाढवलीय. लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यात कुठल्या सेवा बंद असतील आणि कुठल्या सेवा सुरू राहतील, याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून माहिती दिलीय.

?? या गोष्टी बंद राहतील :

  • देशांतर्गत वैद्यकीय सेवा, देशांतर्गत हवाई रुग्णवाहिका आणि सुरक्षेसंबंधी हवाई वाहतूक या सेवा वगळता इतर सर्व हवाई वाहतूक बंद राहील.
  • मेट्रो रेल्वे सेवा बंद राहील.
  • शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक/प्रशिक्षण/कोचिंग संस्था इत्यादी बंद राहतील. मात्र, ऑनलाईन लर्निंगला प्रोत्साहन दिलं जाईल आणि ते सुरूही राहील.
  • हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील. मात्र, आरोग्य, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना राहण्यासाठी असलेले हॉटेल सुरू राहतील, तसंच, क्वारंटाईनसाठीचे आणि लॉकडाऊनमुळं अडकलेल्या पर्यटकांसाठीचे हॉटेल सुरू राहतील. होम डिलिव्हरी करण्यासाठी रेस्टॉरंट सुरू राहतील.
  • चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, मनोरंजन उद्यानं, बार, सभागृह इत्यादी ठिकाणंही बंद राहतील.
  • सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, जिथं गर्दीची शक्यता आहे, त्यांना परवानगी दिली जाणार नाही. (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरू राहतील. पण त्यात लोकांना प्रवेशास परवानगी नसेल.)
  • सर्व धार्मिक ठिकाण

?? वाहतुकीसंदर्भात सूचना :

  • राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक काही अटींसह सुरू राहील. ज्या राज्यांमध्ये ही वाहतूक होईल, त्या दोन्ही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या परवानगीने ही वाहतूक होईल.
  • वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी, नर्स, पॅरा मेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिका यांना कुठल्याही अटीविना आंतरराज्यीय प्रवासास परवानगी द्यावी.
  • सर्व प्रकारची मालवाहूतक/कार्गो, रिकामे ट्रक यांना वाहतुकीस परवानगी द्यावी.

?? कोव्हिड-19 संदर्भात केंद्राच्या सूचना :

  • रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ठरवू शकतात. मात्र, हे ठरवताना प्रत्येक राज्याला केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल.
  • रेड आणि ऑरेंज झोनमधील कंटेनमेंट झोन आणि बफर झोनच्या सीमा संबंधित जिल्हा प्रशासन ठरवू शकतो. मात्र, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनांचं पालन करावं लागेल.
  • कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल. या झोनमध्ये वैद्यकीय सेवेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांशिवाय इतर कुणीही बाहेर फिरणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • कंटेनमेंट झोनमध्ये काँटॅक्ट ट्रेसिंग, प्रत्येक घरात सर्वेक्षण आणि वैद्यकीय सेवा चोख ठेवावी.

?? रात्री 7 ते सकाळी 7 पर्यंत कुणीही बाहेर पडू नये

रात्री 7 ते सकाळी 7 या दरम्यान लोकांचं घराबाहेर पडणं पूर्णपणे बंद करावं. अर्थात, यातूनही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वगळावं.

65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक, आधीपासून आजारी असलेले लोक, गरोदर स्त्रिया, दहा वर्षांखालील मुलं यांनी घरातच राहावं. अत्यावश्यक गोष्टी किंवा वैद्यकीय कारणाशिवाय त्यांना बाहेर पडू देऊ नये

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button