?️अमळनेर कट्टा..युवा कार्यकर्ता रघु घोगलेने रक्तदान आणि वृक्षारोपण करून साजरा केला वाढदिवस..!समाजासमोर ठेवला आदर्श..!
अमळनेर येथील युवा कार्यकर्ता रघूभाई घोगले यांनी आपला वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला. आपल्या वाढदिवसनिमित्त गरजवंत महिलेस रक्तदान करुन एक चांगला संदेश समाजापुढे ठेवला.जिवनतारा रुग्णालयात प्रतीभा पाटील या महिलेस रक्तदानाची गरज होती.रक्तदान चळवळ राबविणारे मनोज शिंगाने यांनी सोशल मिडिया वर आवाहन केले.हा निरोप कळताच स्वतः हुन रघु घोगले यांनी रक्तदान करून कर्तव्य पार पाडले. वाढदिवसाला गरजवंताला रक्तदान करुन माणुसकीचे दर्शन घडविले.येवढेच नव्हे दर तिन महिन्यांनी रक्तदान करणार असेही त्यांनी सांगितले.
त्याच बरोबर वाढदिवसा दिवशी वृक्षरोपण देखील करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिला.सध्या कोव्हिडं काळात कमी होत चाललेल्या ऑक्सिजन ची जाणीव सर्वांनाचं झाली आहे. या अनुषंगाने युवा रघुने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविलेले उपक्रम निश्चितच कौतुकास पात्र आहेत. असे विविध कार्य करणाऱ्या रघू घोगले यांचे सगळ्या स्थरातून कौतुक होत आहे. यावेळी बाळा साळुंखे, फिरोज शेख, कुणाल घोगले, अजय धाप, शंकर घोगले,व रघू घोगले यांचा मित्र परिवार उपस्थित होता.






