?️ अमळनेर कट्टा…नागरिकांचे पाणी अडवणारा डुक्कर…हा डुक्कर राजकीय का?
अमळनेर येथील जीवनज्योती परिसरात आज नळाचे पिण्याचे पाणी येणार होते .परंतु पाण्याच्या व्हाल च्या खड्यात भले मोठे डुक्कर पडल्याने आज त्या परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणीच मिळाले नाही.
तरी हा प्रकार घडल्यावर परिसरातील नागरिक आज पाणी का येत नाही यासाठी जमलेत आणि हा प्रकार डोळ्या समोर दिसला. तेंव्हा नागरिक चर्चा करत असताना ह्या प्रकाराची अडचण राजकीय नेत्याच्या /न. पा अधिकारी यांच्या कानावर घालावी म्हणून भ्रमण ध्वनीवरून फोन केले असता कोणीही कॉल उचले नाहीत. ही शोकांतिका व्यक्त करण्यात आली. त्याच बरोबर अमळनेर शहरात न. पा ने राजरोस वरहा पालन सुरु केले कि काय? अशीही चर्चा सुरु आहे.
नगरपरिषदेच्या संबधित व्यक्तींनी विक्की जाधव साहेबांना फोन केला आहे आणि ते माणसे पाठवतील असे उत्तर दिले आहे.त्यांची मेहरनजर झाल्या नंतर ह्या समस्येचे निराकरण होणार आहे.
ह्या अडचणी संदर्भात फोन केले असता शासन -प्रशासनातील अधिकारी यांनी कुठलाही प्रतिसाद न दील्याने जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.आता हे डुक्कर साधे सुधे नसून राजकीय डुक्कर दिसते.. ह्या डुकराला कोणत्या डुकरांचे अभय शोधावे लागेल असे नागरिकां मध्ये चर्चेत बोलल्यावर एकच हश्या उडाला.






