२० वर्षापासून पाडळसरे धरणाचे काम रखडलेले…कोण घेणार जबाबदारी… श्रेय घ्यायला पुढे येणाऱ्यांची “जात” आम्ही ओळखतो…..जबाबदारीच्या वेळी तू तू आणि श्रेय घेताना मी मी..बॅनर बाजी करून जनता फसणार नाही …आण्णा चौधरी
अमळनेर
२० वर्षापासून पाडळसरे धरणाचे काम रखडलेले आहे.मा.आ.डॉ.बी.एस.पाटील व त्यांच्या सोबतचे पदाधिकारी पदाधिकारी सोडले तर उर्वरित भाजप च्या कोणत्याही मोठ्या पदाधिकाऱ्यांने धरण पूर्ण व्हावे असा प्रयत्न केला नाही.अपवाद संपूर्ण तालुक्यात एकमेवा मर्द माणूस निघाला तो म्हणजे भारतीय जनसंघापासून काम करणारा भाजप पदाधिकारी सुभाष चौधरी! २००८ पासून पाडळसरे धरण पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी जनआंदोलन छेडले.असे चौधरी यांच्यावर आरोप करणाऱ्याना सडेतोड उत्तर देणारे पत्रक कृषि व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी काढले आहे.
पाडळसरे धरण जनआंदोलनावेळेस अंतुर्ली चे महेश पाटील, देविदास देसले,अजयसिंग पाटील, व कृषिभूषण सतिष काटे हे सुभाष चौधरींच्या सोबत स्वखर्चाने फिरत होते.मात्र सहकारी संस्था खाणाऱ्यांना अश्या कार्यातही खाणेच दिसणार ना?जळगांव ची शैक्षणिक संस्था ,बागायतदार संघ,मार्केट कमिटी,गणेशा पतसंस्था इ कोणी खाल्ल्या? पपई मुळे ज्यांचे पोट दुखत आहे त्यांचे ऑपरेशन करायला सुभाष चौधरी पक्के आहेत.
पाडळसरे धरण समितीच्या मोर्चाने निर्माण झालेल्या दबावाने जलायोगाची परवानगी मिळाली.साखळी उपोषण आंदोलनाच्या मंडपाचा खर्च सर्वच जनआंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या खिशातून दिला आहे. नंदुरबार हुन सुपारी घेऊनतर भाजपचा उमेदवार आम्ही पाडला नाही.यावरून सुपारी बाज कोण हे तालुक्यातील जनतेला चांगले ठाऊक झालेले आहे.
आ.सौ.स्मिताताई वाघ यांना श्री.वर्णश्वर महादेव मंदिर संस्थानच्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नाही त्यात एवढे वाईट वाटून भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचे कारण काय?
ज्या नाथाभाऊंच्या मागे पुढे वर्षानुवर्षे आपण फिरत होते त्यानांच आपण विसरले हे आम्ही पाहिले आहे.असेच सुभाष चौधरींच्या हि मागे पुढे कार्यकर्ते म्हणून आपण फिरत होते.त्यांनी खरे तेच सांगितले त्याचे वाईट वाटण्याचे कारणच नाही.सुभाष अण्णांनी कोणतेही काम निष्ठने ,निस्वार्थ,भावनेने केलेले आहे.कोणाकडून त्यांनी बंगला बांधून घेण्याची अपेक्षा केलेली नाही.
लोक कोणकोणत्या माध्यमातून भ्रष्टाचार करतात हे तळागाळातील जनता जाणून आहे.तेव्हा सुभाष चौधरींवर एक बोट दाखवून आरोप करणाऱ्यांनी स्वतःकडे चार बोटे आहेत हे लक्षात ठेवावे.
बरबटलेल्या राजकारण्यांनी जातीयवादाचा आधार घेऊ नये असे आम्ही आवाहन करतो.पाडळसरे धरण पूर्ण होणारच,त्याचे श्रेय युती सरकारचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरीष भाऊ महाजन यांचेच प्रामुख्याने राहणार हे तर आमच्यासाहित तुम्हीही कबूल केले आहे.तेव्हा श्रेय घेणे सोडा. असे पत्रक कृषिभूषण सतिष काटे,सामाजिक कार्यकर्ते नाना वेडु पाटील, प्रविण पाटिल,भास्कर गंगाराम पाटील, ज्ञानेश्वर गंगाराम पाटील, दिपक भोई आदिंनी स्वाक्षरीनिशी काढले आहे.







