स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही आदिवासी पारधी समाजाला भोगाव्या लागत आहेत “नरकयातना”….
6 किलोमीटर चालत गेल्यानं आदिवासी महिलेचा गर्भपात….
आदिवासी पारधी कुटुंबावर गावाचा विनाकारण बहिष्कार….
वाहनात न घेतल्याने 6 किमी चालत जावे लागले पायी….
गावकर्यांच्या सांगण्यावरुन तसेच गावकर्यांच्या दहशतीखाली असलेल्या वाहनधारकांनी महिलेला रुग्णालयापर्यंत सोडण्यास मनाई केली. वाहनधारकांनी नकार दिल्याने शेवटी तिला जवळपास सहा किलोमीटर पायी चालावे लागले. त्यामुळे महिलेचा गर्भपात झाला.
नांदेड – गावाने बहिष्कार टाकल्यामुळे एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज एकविसाव्या शतकातही बहिष्काराची जीवघेणी परंपरा सुरू आहे. जिल्ह्यातील महिपाल पिंपरी या गावात लोकांनी पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. या कुटुंबातील महिलेच्या पोटात दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात नेणे गरजेचे होते. यासाठी महिलेच्या कुटुंबातील लोकांनी प्रवासी वाहतूक करणारे वाहन भाड्याने मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कोणता वाहन चालक आला नाही. गावकर्यांच्या सांगण्यावरून वाहनधारकांनी त्यांचे भाडे घेणे टाळले.असे प्रकार अनेक दिवसांपासून होत असून शिला ताई शिंदे खूप मोठा लढा यापूर्वी दिला आहे. तात्पुरता अधिकारी त्यांना मदत करतात परंतु खऱ्या अर्थाने या कुटुंबातील सदस्य चे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. शिला ताई या वारंवार निवेदने देत आहेत, मागणी करत आहेत परंतु त्यांना ठोस स्वरूपात न्याय मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत आहे.







