Maharashtra

स्वत धान्य दुकानदार नियमानुसार व वेळेवर धान्य देत नसल्याने दहीवद आणि जानवे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन*

*स्वत धान्य दुकानदार नियमानुसार व वेळेवर धान्य देत नसल्याने दहिवद आणि जानवे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन*

स्वत धान्य दुकानदार नियमानुसार व वेळेवर धान्य देत नसल्याने दहीवद आणि जानवे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन*


     दहिवद ता अमळनेर येथील स्वत धान्य दुकानदार नियमानुसार व वेळेवर धान्य देत नसल्याची तक्रार दहिवदच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती सुषमा वासुदेव पाटील यांनी वेळोवेळी तहसिलदार यांना भ्रमणध्वनीने केलेली होती त्याबाबत चौकशी ही करण्यात आली होती. ग्रामस्थांचे जवाब घेऊन पंचनामा ही केला असतांना  रेशन दुकानदार नियमानुसार व वेळेवर धान्य पुरवठा करतच नव्हता.

स्वत धान्य दुकानदार नियमानुसार व वेळेवर धान्य देत नसल्याने दहीवद आणि जानवे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन*

   दोन दिवसांनी पोळा सण आला तरी ही ग्रामस्थांना हक्काचे धान्य मिळत नसल्याने आज रोजी दहिवद गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच श्रीमती सुषमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर पाटील, पन्नालाल मावळे, दिपक पाटील, गुणवंत पाटील यांनी तहसिल कार्यालयावर हक्क मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांसह आंदोलन करण्यात आले. दहिवद च्या ग्रामस्थांना आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा जयश्री साळुंके व काँ अमृत महाजन, आदिवासी पारधी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी ही पाठींबा दिला दहिवद च्या रेशन आंदोलनाची माहिती दक्षता समिती तालुकाध्यक्ष तथा विधानसभा सदस्य शिरीष दादा चौधरी साहेब व जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुनिल सुर्यवंशी साहेब यांना हि दुरध्वनी ने देण्यात आली.माहिती मिळताच आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आंदोलन स्थळी भेट देत दहिवद ग्रामस्थांशी संवाद साधत तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले व तहसिलदार श्रीमती देवरे मॅडम यांनी उद्या दहिवद गावाला जाऊन चौकशी करण्याची माहिती भ्रमणध्वनी द्वारे दिली तसे लेखी पत्र तहसिल कार्यालय यांनी आमदार शिरीषदादा चौधरी साहेब यांच्या हस्ते दहिवद ग्रामस्थांना दिले व आजचे आंदोलन हे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या शब्दाला मान देत मागे घेण्यात आले. आजच्या आंदोलनात दहिवद चे ग्रा पं सदस्य सुनिल पाटील सह मनोज पवार, नाना माळी, सोपान माळी, धर्मा माळी, मच्छिंद्र माळी, विमलबाई माळी, विजयाबाई सरोदे, उषाबाई पाटील, सुशिलाबाई कोळी, भिकुबाई माळी, जिजाबाई माळी, लीलाताई माळी, सरलाबाई माळी, हिरकनबाई माळी, शांताराम भिल, रामकृष्ण धोबी, राजेंद्र माळी, संजय माळी, ज्ञानेश्वर जाधव, मनोज पाटील, प्रविण ठाकुर, भरत माळी, सुरेश माळी, प्रविण माळी, खंडेराव माळी, देविदास माळी, संतोष पाटील, सुकलाल सोनवणे, देवेंद्र माळी, विनोद पाटील सह शेकडो महिला पुरुष ग्रामस्थांनी आंदोलन केले.

स्वत धान्य दुकानदार नियमानुसार व वेळेवर धान्य देत नसल्याने दहीवद आणि जानवे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button