स्पार्क मल्टिपर्पज फाउंडेशन अमळनेर तर्फे १५ जून ला गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वही वाटप सह ईद मिलान कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर
स्पार्क मल्टिपर्पज फाउंडेशन अमळनेर तर्फे १५ जून ला गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वही वाटप सह ईद मिलान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर च्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात वर्ष भरापूर्वी ‘स्पार्क’ ने पदार्पण करून अनेक सामाजिक उपक्रम राबविले.’स्पार्क’ च्या पहिल्या वर्धापन दिवसा निमित्त सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नगरपालिका शाळा नंबर १ येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात संस्थेतर्फे गरीब,गरजू विद्यार्थ्यांना शालय साहित्य व वही वाटप होणार आहे तर सामाजिक सलोखा वाढवीण्यासाठी
ईद मिलान कार्यक्रमाच्या माध्यमातून शिरखुमा स्नेह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास आ.श्री.शिरिषदादा चौधरी,आ.सौ.स्मिताताई वाघ ,नगराध्यक्षा सौ.पुष्पलताताई पाटील,हे विशेष मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर , उपविभागीय अधिकारी,अमळनेर,श्रीमती सिमा अहिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाणे , तहसीलदार, श्रीमती ज्योतीताई देवरे,पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, मुख्याधिकारी श्रीमती शोभाताई बाविस्कर,प्रा जयश्री दाभाडे साळूके,
मंगळग्रह मंदिर संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी व पदाधिकारी , विशेष सहकार्य रियाज काजी, मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन, रॉयल उर्दू स्कुल,रणजित शिंदे आदिही
उपस्थित असतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्पार्क फाउंडेशन चे अध्यक्ष पंकज दुसाने,उपाध्यक्ष डॉ. हर्षल दाभाडे,सचिव प्रशांत जगदाळे आदिंनी केले आहे.







