औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडच्या भवन गावामध्ये भरदिवसा चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
vo :- सिल्लोड तालुक्यातील भवन येथील मधुकर शहाजी घोरपडे काही कामानिमित्त दिवसा बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराचा मागील दरवाजा चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला घरातील नगदी 28 हजार रुपये सोन्याचे व चांदीचे दागिने एकूण मुद्देमाल अंदाजे 60,000 अशी चोरट्यांनी भरदिवसा पळविले.
त्यांच्या घरात सहा महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा चोरी झाल्याने घोरपडे यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत .
दुसरे घर हे समाधान कळम या शेतकऱ्याच्या घरांमध्ये झाली आहेत समाधान कळम हे शेतामध्ये शेती कामास गेल्या असतं त्यांच्या घरावर मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला समाधान कळम यांच्या पत्नीचे सोन्याची पोत पिगीबँक एक मोबाईल व घरातील डब्यामध्ये ठेवलेली कॅश असा 50,000 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या घटनेने समाधान कळम यांच्यावरही दुःखाचे डोंगर कोसळले आहेत,
दोन दिवसांत तिसरी घटना वडोद बाजार पोलीस ठाणे अंतर्गत चिंचखेडागावात घडलीय
चिंचखेडा येथील शेतकरी गंगाराम मनाची वाणी हे शेतात कामात साठी गेले असताना चोरट्यांनी यांचे घर फोडले
तर आज पुन्हा चिंचखेड्यात घर फोडी झाली येथील विठ्ठल मोतीराम राऊत यांचे घर फोडी झाली यात यांच्या घरातील सोन्या चांदी च्या दागिनेसह अंदाजे 1,50,000 रुपये ची चोरी झालीय .
या संदर्भात वढोदबाजारा पोलीसा नी दाखल घेतली आहे .पोलिसानं कडून रात्रीचे गस्त वाढवली आहे .
या घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण व वडोद बाजार पोलीस हे करीत आहेत.







