शेतात कामाला गेलेल्या युवकाचा शॉक लागल्याने मृत्यू
सडावण ता. अमळनेर :- येथील सागर अशोक पाटील ह्या २३ वर्षीय युवकाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सदर युवक हा स्वतःच्या शेतात कामासाठी गेला असता. दुपारी पाऊस सुरू झाला. व त्याचे कपडे ओले झाले. तो त्याच्या शेतातील एका लाईटच्या खांबाजवळ उभा असा त्याला शॉक लागला. हे शेतात असलेल्या त्याच्या आई व वडील यांना समजले असता त्यांनी लगेच खासगी वाहनात त्याला टाकले व अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यास तेथुन ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे हलवण्यात आले. तेथे त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







