शासनाच्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करा रवि पाटील देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष दिनेश पाटील (दिनु बाबा)यांचे आवाहन
प्रतिनिधी नुर खान
जगभरात कोरोणा आजाराने थैमान घातलेले असताना आपल्या भारत देशाला सुद्धा ह्या विषाणूने आपल्या जाळ्यात ओढले आहे.परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारच्या उत्कृष्ट व सुयोग्य नियोजनामुळे तसेच आरोग्य खाते,पोलीस खात्यामधील कर्मचारी बांधवांच्या मेहेनतीमुळे आपण कोरोणावर लवकरच मात करु त्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष रवि पाटील व शहर अध्यक्ष दिनेश पाटील यांनी केले आहे.
इतर देशांच्या माणाने भारतात परीस्थिती नियंत्रणात असुन लाॅकडाऊन आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी असुन त्याला गंभीरपणे घेऊन वायफळ कारणासाठी बाहेर जाणे टाळावे.आपल्या कुटुंबात किंवा परिसरात कोणालाही सर्दी,खोकला,ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत शासकीय आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवावे तसेच अत्यावशयक कारणासाठी बाहेर पडल्यास माक्स आणि सॅनिटायझर व आवश्यक उपाययोजनांचा वापर करुन आपल्याला व देशाला कोरोणामुक्त करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करुन लाॅकडाऊन मधे स्वताला व परिवाराला आनंदी ठेवण्यासाठी विविध भारतीय संगीताचे गायन व श्रवण करावे.स्वरांमधे एक वेगळीच जादू असुन संगीतामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन नैराश्य तसेच मानसिक समस्या घालवली जाऊन जीवन जगण्यासाठी एक नवीन चेतना व प्रेरणा मिळते असेही *रवि पाटील व दिनेश पाटील* यांनी सांगितले आहे





