Maharashtra

लाँकडाऊन मध्ये घरीच थांबा अणि सोने जिंका देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष रवि पाटील यांची अनोखी स्पर्धा

लाँकडाऊन मध्ये घरीच थांबा अणि सोने जिंका देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष रवि पाटील यांची अनोखी स्पर्धा

कोरोना मुळे देशभरात लाँकडाऊन करण्यात आले आहे मात्र तरीही नागरिक कडुन घराबाहेर पडण्यास पसंती दिली जात आहे त्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील धार गावातील देवा गृप फाऊंडेशन याचे तर्फे एक भन्नाट स्पर्धा आयोजित केली आहे घरात थांबा बक्षिस जिंका असे याचे नाव असुन लाँकडाऊन च्या कालावधी मध्ये घराबाहेर न पडणाऱ्या कुटुंबाना बक्षिस दयाचे आहे असे देवा गृप फाऊंडेशन धार यांनी ठरवले आहे लाँकडाऊन मध्ये घराबाहेर न पडणाऱ्या नागरिकांसाठी स्पर्धा पाहिले बक्षिस म्हणुन 22 कँरेट सोन्याचे नाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला दुसरे बक्षीस रेफ्रिजरेटर आणि तिसरे बक्षिस म्हणून वँशिग मशीन देण्याची घोषणा देवा गृप फाऊंडेशन धार यांनी केली याच बरोबर 50 उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे धार येथील मा.उपसरपंच तथा देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष रवि पाटील यांनी स्पर्धा संदर्भात महिती दिली.

लाँकडाऊनचे नियम पाळणाऱ्या काही तरी बक्षिस द्यायला हवे असे आम्हाला वाटल्याने आम्ही ही स्पर्धा सुरू केली आहे 6 एप्रिल रोजी या संदर्भात चर्चा झाली आहे कोरोना मुळे लोकांना घरातच सुरक्षित रहावे त्यासाठी आम्ही पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला लाँकडाऊन कालावधी मध्ये बाहेर भटकणाऱ्या लक्ष ठेवण्यासाठी आम्ही काही लोकांची नेमणूक केली ज्या कुटुंबातील सदस्य अशाप्रकारे भटकताना अढळेलत ते कुटुंब स्पर्धेमधुन बाद होईल असे ठरवण्यात आले अशी माहिती *मा उपसरपंच रवि पाटील* नुसार यांनी दिली आहे लाँकडाऊन संपल्यानंतर जे कुटुंब आम्ही घराबाहेर पडलो नाही असा दावा करेल त्याच्या कडुन आम्ही प्रतिज्ञापत्रावर लिहुन घेणार आहेत प्रतिज्ञापत्रावर लिहुन देणाऱ्या सर्व कुटुंबाना कुपन देण्यात येईल आणि त्या मधुन लकी ड्रॉ पध्दतीने विजेत्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button