रोझोदा रावेर

रोझोदयात साजरी केली आगळीवेगळी हरातालिका..

रोझोदयात साजरी केली 
 आगळीवेगळी हरातालिका..

रोझोदयात साजरी केली आगळीवेगळी हरातालिका..

रोझोदा प्रतिनिधी विलास ताठे
आज च्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात  जिवनातील खरी भक्ती  म्हणजे माणसातील माणुसकी  आहे . नाहीतर 
 हरतालिका हे व्रत करणाऱ्या महिला  झाडांची कोवळी पाने,फुले, फळ,तोडून आणून पुजा  करतात  ,आणि हेच कोवळे पाने,फुलं फळ संध्याकाळ पर्यंत कचऱ्याच्या ढिगारावर जातिल ,पण हेच व्रत सौ. छाया पाटील  यांनी  पुजा पाठ न करता एका वेगळ्याच पद्धतीने केले ,त्यांनी  घराच्या जवळूनच जात असलेला रोझोदा चिनावल रोडचे खडीकरणाचे काम चालू आहे ,त्या रोडवरती मजदूरी करत असलेल्या मजुरांच्या मुलांना त्यांनी  जवळ बोलवून रांगेत बसवले ,व सर्वांना मस्त मुंगाच्या डाळीची खिचडी वाढून जेवण पोटभर  घातले ,म्हणजे च  प्रश्न जेवणाचा नाही ,प्रश्न आहे तो  कुठेतरी सौ. छाया दिनकर पाटील  यांच्या मनात आई जिजाऊ, सावित्री, रमाई ,यांचे विचार रुजले आणि त्यांनी .आज त्यांच्या  चेहऱ्यावरील आनंद व समाधान पाहून सर्वाचेच  मन  गहिवरून आले, या विचारांना सर्व परिसरात  सलाम करण्यात येत आहे. .

Leave a Reply

Back to top button