भ्रष्ट सरपंच आणि सदस्यावर येणार संक्रात….
प्रतिनिधी। कळवण
वेरुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमता करणे, मालमत्ता अथवा सरकारी योजना निधीचा अपहार करणे, ग्रामपंचायतीमार्फत मिळणाऱ्या सरकारी योजना मूळ लाभार्थ्यांचे दस्ताऐवज काढून दुसऱ्याचे दस्ताऐवज जोडून ती योजना दुसऱ्याला देण्याचे प्रकार घडत आहे यात विहिर,सारायंत्र,बैलगोठा, ताडपत्री, पी.एम.आवास योजना, आशा अनेक गोरगरीबाच्या योजना डावलून त्या योजना जवळच्या व ओळखीच्या व्यक्तीनां दिल्याचे प्रकार घडत आहे व आदिवासी विकास विभागाच्या योजना,कृषी योजना, स्वयंमयोजगार योजना गोरगरीब वर्गापर्यंत पोहचवल्या जात नाही आणि पोहचल्या तरी त्या योजनेच्या लाभार्थीकडून एका सहीसाठी किंव्हा देण्यासाठी ५०० ते ६००० रु. उकळवण्याचे प्रकार घडत आहे पैसे घेऊन सरपंच, उपसरपंच, सदस्य स्वतःचे खिसे भरत आहे अशानां योग्य ती चौकशी होवून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल झाले पाहिजे.
गावात काही ग्रामसभा झाल्या तर काही ग्रामसभा झाल्याच नाही नोव्हेंबर २०१८ च्या ग्रामसभेमध्ये १४ वित्त आयोग,पेसा, व इतर आर्थिक निधीची विचारपूस केली असता सदर ग्रामसेवकांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. व २६ जानेवारी २०१९ ची गावात ग्रामसभा झालीच नाही फक्त ग्रामस्थांकडून रजिस्टर मध्ये सह्या करून घेतल्या आहेत तसेच आर्थिक निधीची माहिती न देणाऱ्यावर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी नेमून योग्य ती कार्यवाही करावी.
राज्य शासनाचा विविध प्रकारचा निधी आता थेट ग्रामपंचायतीना येत आहे यामध्ये प्रामुख्याने वित्त आयोगाची निधी ग्रामपंचायतीला सर्वाधिक मिळत आहे निधीचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी ग्रामविकास खात्याकडे प्राप्त झाल्या आहेत या प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करायला हवे आहे वरील अपहार, सरकारी योजना लुट करू पाहणाऱ्या संबधिताविरुद्ध पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रथम चौकशी व निष्कर्ष काडून असल्यास संबधिताविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.







