पेठ प्रतिनिधी विजय देशमुख
आज शिवशेत ता.पेठ येथे ग्रांमसभा चालु असतांना ऐका शेतकर्यांने अशी माहिती दिली की मोहदांड शेजारील व आमडोंगरा या गावाजवळ भदर या डोंगराला तडे गेलेत .म्हणुन ग्रामस्थांनी या घटनास्थळी लगेच जाऊन बघीतले असता हि घटना सत्ये असल्याचे निदर्शनात आले. ग्रामस्थांच्या म्हणन्यानुसार१० तारखेला हिघटना घडलेली आहेे परंतु पाऊस चालु असतांना हि घटना लक्षात आली नाहि. त्या ठीकाणी ६ते८ फुट खाली खोल भेग पडलेली दिसते. आणि १०ते २०फुट लांब आहेे.या मुळे परिसरात ऐकच चर्चा चालु आहेे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र महामंडळ विभागाच्या अधिकिकाराखाली येते म्हणुन त्यांना १४ तारखेला ग्रामस्थांनी सुचीत केला आहेे.परंतु त्यांचा ऐकही सरकारी व्यक्ती पाहणी करण्यासाठी आलेले नाहित.ग्रामस्थांचे म्हणने आहेे की कोतांहि अनुचीत प्रकार घडण्याआधी प्रशासनाने याची दखल घ्यावी. घटनास्थळी सरपंच पंढरीनाथ महाले,ग्रामसेवक जि .एस.शेवरे. काशिनाश भडांगे, भारत माळगावे ,हेमराज पवार,मोतीराम महाले पो.पाटील,सदस्य. आदि ग्रामस्थ उपस्थीत होते.







