मोठा वाघोदा सह परिसरात दमदार पावसाची प्रतिक्षा
पाऊसाअभावी पेरण्या खोळंबल्या
मोठा वाघोदा सह परिसरात जुन महिना संपला परंतु पावसाने दमदार हजेरी दिली नसल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झालेला दिसत आहे व पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्याही लांबणीवर गेल्या आहेत कमी पाऊसात पेरणी केली तर दुबार पेरणीचे संकट या परिसरातील शेतकर्यावर कोसळू शकतो म्हनुनच पिक पेरण्या खोळंबलेल्या आहेत मोठा वाघोदा सह सभोवतालची गांवे रावेर तहसिल कार्यालयाचे निंभोरा महसुल मंडळाचे अंतर्गत कार्यक्षेञात समाविष्ठ आहे या सर्कल मध्ये पावसाची दिनांक ३०/६/२०१९ ते ०१/०७/२०१९ जुलै दरम्यान काळात पाऊस आकडेवारीनुसार अहवालात 00 mm( 0 टक्के )पावसाची नोंद करण्यात आलेली असुन शेतकरी राजा दमदार पाऊस पडण्याच्या प्रतिक्षेत आहे







